मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified शनिवार, 12 ऑक्टोबर 2019 (15:44 IST)

VASTU TIPS: मुलांकडून दान केल्याने घरात येते समृद्धी, हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातून दुर्भाग्य दूर होईल

बरीच मेहनत केल्यानंतर जर यश मिळत नसेल तर याचे कारण दुर्भाग्य किंवा आमच्या जवळपास असणारी नकारात्मक ऊर्जा असू शकते. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मुलांकडून दान करावे रवा. यामुळे घरात समृद्धी येईल.  
 
यश मिळवण्यासाठी मेहनत जेवढी गरजेची असते तेवढंच भाग्याचा साथ देखील जरूरी असतो. वास्तूमध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहे ज्याचे पालन करून तुम्ही तुमच्या जीवनातून दुर्भाग्य दूर करू शकता. तर जाणून घेऊया या उपायांबद्दल.  
 
सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी देव स्मरण करावे. रोज हनुमान चालीसाचा पाठ करावा. भाग्याचा साथ मिळवण्यासाठी कुटुंबीयांबरोबर तीर्थयात्रा अवश्य करावी. यामुळे घर परिवारात धन-संपत्तीत वाढ होते.  
 
लहान मुलं मनाने फारच निर्मलं असतात. अशात मुलांकडून दान आवश्यक करवून घ्यावे. असे केल्याने संपूर्ण परिवाराला सौभाग्याची प्राप्ती होते. 
 
अमावस्याच्या दिवशी एखाद्या गरिबाला भोजन करवावे. पितरांची मनापासून आठवण करावी. गोमातेला पृथ्वीवर देवाचे वरदान मानण्यात आले आहे. म्हणून घरात तयार असलेल्या भोजनातून गायीचा भाग आवश्यक काढावा. असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.  
 
संध्याकाळी कधीही घर झाडू नका. असे केल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. घरात देवी देवतांचे ताज्या फुलांनी शृंगार करावा. जेव्हा आपण घरात प्रवेश करता तेव्हा रिकाम्या हाताने जाऊ नये. नेहमी काही ना काही घेऊनच घरात प्रवेश करावे. सकाळ सायंकाळी कापूर आरती जरूर करावे. असे केल्याने परिवारात आकस्मिक अपघाताची शक्यता कमी होऊन जाते.