वृषभ राशीचे 2020 मधील टेरो कार्ड द्वारे भविष्य जाणून घेऊया

Tarot Cards Predictions for 2020
Last Modified शनिवार, 11 जानेवारी 2020 (14:35 IST)
वृषभ : कार्ड - Two of Cups
वृषभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष खूप रोमांचकारी ठरणार आहे. आपले नवीन लोकांशी संपर्क होतील. त्यामुळे आपणांस हे वर्ष फायदेशीर ठरणार आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक स्तरावर आपणांस यश मिळणार आहे. आपण सृजनशील आणि प्रेरणादायक असल्याने आपल्या कारकीर्दीचे कौतुक होईल. काही कार्यांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे. अपेक्षित निकाल मिळण्यास अडचण होऊ शकते. व्यवसायात आपणांस लाभ मिळेल. व्यावसायिक भागीदार आपणांस साहाय्य करतील. कुटुंबातील सदस्यांना त्यांचा कामासाठी मदत करून त्यांना आपण आधार देऊ शकता. अती प्रवास आपणांस त्रासदायक होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. गुंतवणूक केल्यास योग्य फायदा होईल. आर्थिक गुंतवणूक करण्याआधी त्याचं सखोल अध्ययन करा.

कॅरियर :- आपण आपल्या कारकीर्दीत चांगले काम कराल. व्यवसाय निमित्त सहली कराल. नवे लोकं भेटतील जे आपणांस फायदेशीर ठरतील. आपणांस उत्तम कारागिरीसाठी पुरस्कार मिळेल. कारकीर्दी मध्ये आपल्या संकल्पनांचे चयन होतील. आपण कल्पनाशील आणि सृजनशील आहात.

व्यवसाय :- आपण आपल्या व्यवसायातून भरघोस नफा मिळवाल. आपल्या कल्पना आपणांस नफा मिळवून देतील. व्यवसायातील भागीदार आणि विक्रेता आपल्या बाजूने कार्य करतील. नवीन व्यवसायात गुंतवणूक करणे लाभदायक ठरेल.
कुटुंब :- आपले कुटुंब आपल्यावर अवलंबून असल्याने आपण त्यांना आधार द्याल. कुटुंबाची साथ आपणांस मिळेल. आपल्या कुटुंबात वाढ होऊ शकते. त्या मुळे आपण आनंदी व्हाल. घरात मांगलिक कार्य होतील. त्या मुळे आपणांस नवी ऊर्जा मिळेल.

आरोग्य :- आपण कंबर किंव्हा मणक्यांच्या त्रासाने ग्रसित होऊ शकता. कामानिमित्त प्रवास होतील त्यामुळे त्यांचा परिणाम आपल्या आरोग्यांवर होईल. वर्ष सरता सरतं आरोग्यात सुधारणा होईल. चांगल्या आर्थोपेडिकचा सल्ला फायदेशीर ठरेल.
प्रेम आणि विवाह :- अविवाहितांसाठी यंदा विवाह कार्ड आले आहे. आपणांस विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील व गोष्टी पुढे वाढतील. प्रेमींसाठी चांगला काळ आहे. कुटुंबांकडून आपणांस स्वीकृती मिळेल. विवाहितांसाठी हे वर्ष चांगले जाणार आहे.

आर्थिक स्थिती :- आर्थिक गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ आहे. तज्ज्ञांकडून सल्ला
घ्या. नफा होईल. आपल्याकडे उत्पन्नाचा मोठा स्रोत असल्यास चांगली बचत होईल.
टिप :-
* देवी लक्ष्मीच्या कृपादृष्टीसाठी श्रीराम बीज मंत्राचा जप करावा.
* व्यवसायात प्रगतीसाठी Tiger Eye घाला.
* उत्तर दिशेस कोपऱ्यात धबधब्याचे चित्र लावा.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

महाशिवरात्रीच्या नंतर पडणारी अवस का आहे खास जाणून घेऊ

महाशिवरात्रीच्या नंतर पडणारी अवस का आहे खास जाणून घेऊ या....
हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे खूप महत्व आहे. हिंदू धर्मात हा एक मोठा सण आहे. या दिवशी शिव ...

दर्श अमावस्येला केले जाणारे उपाय...

दर्श अमावस्येला केले जाणारे उपाय...
आज दर्श अवस आहे. हिंदू शास्त्रात ही शुभ मानली जाते. या अमावास्येला श्राद्ध अमावस्या पण ...

महाशिवरात्रीला आज ‘शश योग’

महाशिवरात्रीला आज ‘शश योग’
महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज एक विशेष योग जुळून आला आहे. तब्बल ५९ वर्षांनतर आज ...

श्रीशिवशंकर द्वादश नामावली

श्रीशिवशंकर द्वादश नामावली
महादेवाचे अनेक मंत्र, श्लोक, स्रोत, चालीसा आणि अष्टक उपलब्ध आहेत परंतू हे महाशिवरात्रीला ...

12 ज्योतिर्लिंग ज्यात आहे महादेवाचा वास

12 ज्योतिर्लिंग ज्यात आहे महादेवाचा वास
Kashi Vishwanath काशी विश्वनाथ मंदिराला वाराणसीचं स्वर्ग मंदिर असे देखील म्हटलं जातं. ...

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात
20- काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला पाहिजे असे माजी ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य पूजारी नेमले
उत्तर कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील गदग येथे लिंगायत धर्माने धर्म परंपरेला छेद देत ...

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये
सामान्यपणे बाजारात १० रुपयांपासून १ हजारपर्यंतच्या किंमतीचे साबण बाजारात मिळतात. परंतु एक ...

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत
छत्रपती घराण्यातील सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती अचानक ...

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा
भीमाकोरेगाव हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ...