सोमवार, 3 नोव्हेंबर 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Updated : मंगळवार, 30 सप्टेंबर 2025 (07:40 IST)

Kanya Pujan Gift Ideas बजेट फ्रेंडली कन्या पूजन भेटवस्तू

Kanya Pujan Gift Ideas
कन्या पूजनासाठी मुलींना बजेट फ्रेंडली आणि आकर्षक भेटवस्तू निवडताना त्यांचे वय, आवडीनिवडी आणि उपयोगिता लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. खालील काही कल्पना तुमच्या पूजन सोहळ्याला आनंददायक आणि संस्मरणीय बनवू शकतात:
 
चॉकलेट्स आणि केक
1. मुलींना चॉकलेट्स आणि केक आवडतात. छोटे चॉकलेट बार्स किंवा मिठाईचे छोटे बॉक्स देणे एक उत्तम पर्याय आहे.
 
2. स्टेशनरी किट्स
नवीन पेन्स, शार्पनर्स, टॉय-शेप्ड इरेझर्स आणि पेन टॉपर्स मुलींना आवडतात. हे उपयोगी आणि आकर्षक भेटवस्तू ठरतात. पुस्तके, पेन्सिल बॉक्स, क्रेयॉन, नोटबुक, रंगीत पुस्तके इत्यादी मुलांसाठी नेहमीच उपयुक्त असतात. ही भेट त्यांना अभ्यास करण्यास देखील प्रेरित करते.
 
3. हेअर अॅक्सेसरीज
ग्लिटर क्लिप्स, कार्टून बँड्स, आणि ब्राइट रबर टायस मुलींना आवडतात. हे भेटवस्तू मुलींना शाळेत किंवा बाहेर जाताना वापरायला आवडतात.
 
4. लहान पर्स
मुलींना घराबाहेत पडताना स्वत:ची बॅग किंवा पर्स हवी असते. हल्ली बाजारात खूप सुंदर आणि आकर्षक बॅग्ज किंवा पर्स उपलब्ध असतात. ही एक आकर्षक भेटवस्तू ठरू शकते.
 
5. लंच बॉक्स किंवा सिप्पर
लहान मुलींना रंगीबेरंगी लंच बॉक्स किंवा सिप्पर देणे एक उपयोगी आणि आकर्षक भेटवस्तू आहे.
 
6. ज्वलेरी
रंगीबेरंगी बांगड्या, बिंदी आणि लहान कानातले हे मुलींसाठी पारंपारिक आणि सुंदर भेटवस्तू असू शकतात. मुलींना या प्रकारच्या गोष्टी खूप आवडतात.
 
7. सॉफ्ट टॉयज
लहान मुलींना सॉफ्ट टॉयज आवडतात. हे त्यांचे खेळण्याचे साथीदार ठरू शकतात.
 
8. भांडी
मुलांसाठी आकर्षक अशश प्लेट, वाट्या, ग्लास किंवा चमचा यांचा संच हा एक पारंपारिक आणि उपयुक्त भेटवस्तू पर्याय आहे. तो बराच काळ टिकतो.
 
9. पिगी बँक किंवा गुल्लक
मुलांमध्ये लहानपणापासूनच बचत करण्याची सवय लावण्यासाठी पिगी बँक देणे ही एक उत्तम भेटवस्तू आहे.
 
10. फ्रूट बास्केट किंवा ड्राय फ्रूट पॅक
फळे किंवा ड्राय फ्रूटचा पॅक देणे हा देखील निरोगी आणि उपयुक्त भेट म्हणून एक उत्तम पर्याय आहे.
 
11. हेअर अॅक्सेसरीज
केसांसाठी अॅक्सेसरीज मुलींसाठी उपयुक्त आहेत, त्यांचे वय काहीही असो आणि बहुतेक मुलींना ते आवडतात. नवरात्रीत लहान मुलींसाठी हेअर क्लिप, हेअरबँड आणि रिबन ही एक छोटी पण छान भेट आहे.