मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 11 जानेवारी 2020 (15:12 IST)

कन्या राशीचे 2020 मधील टेरो कार्ड द्वारे भविष्य जाणून घेऊया

कन्या कार्ड - Two of Wand
कन्या राशीसाठी, वर्ष 2020 समिश्रित फळ देणार आहे. या वर्षी आपणास कारकीर्दीत यश मिळेल. पण काही ठिकाणी तोटा पण संभवतो. शांत राहा. काही गोष्टी अचानकपणे मिळतील. व्यवसायात असणाऱ्यांना लाभ मिळणार आहे. खाद्य पदार्थाच्या व्यवसायाशी निगडित असणाऱ्यांचे चांगले नाव होईल. आपला परिवार आपणांस सहकार्य करेल. आपण आपल्या परिवाराची खूप काळजी घेता. त्यांना आनंदी ठेवाल. क्रीडा पटूंना दुखापत होऊ शकते. स्पर्धेपूर्वी लांबाचा प्रवास करू नये. किंव्हा जास्त वजन उचलू नये.

करियर :- करियरच्या दृष्टीने हे वर्ष वेळेनुसारच असणार आहे. आपण यश संपादन कराल. कामात हलगर्जीपणामुळे उत्पादकतेवर त्याचा परिणाम पडू शकतो. मित्रांशी स्पर्धा वाढेल त्यामुळे विचलित व्हाल. शांत राहा.
 
व्यवसाय :- आपण नवीन व्यवसायात गुंतवणूक कराल. खाद्य पदार्थांचे व्यवसायात आपणांस फायदा होईल. आपण आपल्या व्यवसायातून नफा मिळवाल आणि बचत पण कराल. आपणांस नवीन संपर्कांचा फायदा होईल. 
 
कुटुंब :- आपले कुटुंब आपल्या यश आणि कर्तृत्वाने भारावून जातील. त्यांचे सहयोग आपणांस मिळतील. त्यांच्याशी मोकळे राहा. आपल्या कुटुंबासाठी हे वर्ष चांगले जाणार आहे.  
 
आरोग्य :- वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. दुखापत होऊ शकते. प्रवास करताना सावध राहा. क्रीडापटूंना दुखापत होऊ शकते. आपल्या शरीराकडे लक्ष द्या. प्रशिक्षकाच्या निर्देशानुसारच कसरत, व्यायाम करा. 
 
प्रेम आणि वैवाहिक जीवन :- अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील. प्रेम विवाह करणाऱ्याच्या घरातून सहयोग मिळेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन चांगले राहील.
 
आर्थिक स्थिती :- आपण आपल्या छंदातून मिळकत मिळवाल. अतिरिक्त उत्पन्न आपल्याला आर्थिकरीत्या स्थिर करतील. आर्थिक दृष्ट्या हे वर्ष चांगले जाणार आहे. एखादा मोठा नफा मिळवण्यासाठी गुंतवणुकीत नियोजन करू शकता.
 
टिप :- * घरात धनप्राप्तीसाठी आणि भाग्य वृद्धीसाठी मनी बॉक्स आणि मनी प्लांटला जांभळ्या भांड्यात ठेवा.
* शुक्राचे शुभफळ मिळविण्यासाठी शुक्राचे ताबीज धारण करा.