हिप्सची चरबी कमी करण्यासाठी उपाय
हिप्सला शेप देण्यासाठी काही सोपे उपाय:
* उभे राहून गुडघे अर्धे (किमान 45 अंश कोनात) मोडावे. हिप्सचे स्नायू संकुचित करावे. दहा सेकंद अश्याच स्थितीत राहा. पुन्हा सामान्य स्थितीत या. गुडघे मोडताना हात समोरच्या बाजूला पसरवा. ही क्रिया किमान पाच मिनिटापर्यंत करावी.
* झेप घेण्याच्या मुद्रेत एक पाय लांब टाका. हातांना पुढील पायाच्या गुडघ्यावर ठेवून मागील पायाचा गुडघा किंचित मोडा, एक क्षणासाठी ताट उभे राहा. पाय बदलून पुन्हा ही क्रिया करा. पाय अदलून- बदलून दहा-दहा वेळा ही क्रिया करावी.
गुडघे आणि भुजांच्या पुढील भागावर शरीर टेकवा. उजवा पाय गुडघ्यापासून मोडा, पंजा वर करून प्वाइंट करत ठेवा. पाय जितका शक्य असेल तेवढा वर उचलून खाली आणा. पाठ अगदी सरळ असू द्या. तीस सेकंदापर्यंत ही क्रिया करा. पाय बदलून पुन्हा करा.
गुडघे मोडून पाठीवर लेटून जा. हिप्सच्या रुंदीप्रमाणे पायांमध्ये जागा ठेवा. हात दोन्ही बाजूला सरळ ठेवा हाताचे तळवे जमिनीवर. हिप्स संकुचित करून जमिनीपेक्षा जरा वरच्या बाजूला उचला. जमिनीवर डोके, खांदे आणि पायांचा जोर टाकून ही क्रिया करा. एक सेकंद अश्याच स्थिती राहा. हळू-हळू हिप्स पुन्हा जमिनीला टेकवा. ही क्रिया पाचदा करा.
टिप: हे व्यायाम सामान्य असले तरी शरीराला कोणत्याही प्रकाराची व्याधी किंवा दुखणे असल्यास व्यायाम करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.