1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (18:32 IST)

Perfect Eyeliner या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने परफेक्ट आयलायनर लावा

Apply Perfect Eyeliner with these tips and tricks मेकअप लूक पूर्ण करण्यासाठी आयलायनर योग्य प्रकारे लावणे आवश्यक आहे. डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी परफेक्ट आयलायनर लावणे खूप गरजेचे आहे. बर्‍याच स्त्रिया दररोज आयलायनर लावणे पसंत करतात, तर काही स्त्रिया ते फक्त पार्टीत लावतात. अशा परिस्थितीत क्वचितच आयलायनर लावणाऱ्या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक महिलांचे हात थरथरतात,अनेकांची समस्या अशी असते की, एका डोळ्यात लायनर बरोबर लागतो, पण दुसऱ्या डोळ्यात व्यवस्थित लागत नाही. अशा परिस्थितीत जाणून घ्या काही टिप्स आणि युक्त्या- 
 
1 अनेक स्त्रिया प्रथमच चांगल्या पद्धतीने आयलायनर लावतात, पण आपण नवीन असाल तर अशी चूक करू नका. परफेक्ट लाइनर लावण्यासाठी, लहान भागाची निवड करा. .
 
2 बऱ्याच वेळा आयलायनर लावताना अनेक महिलांचे हात खूप हलतात, जर असे  आपल्या सोबतही होत असेल तर आपण कोपराला कशाचा तरी आधार देऊ शकता. असे केल्याने हात हलणार नाही आणि  लाइनर सरळ लागेल. 
 
3 लाइनर लावताना हात थरथरत असतील तर आपण पेन्सिल आयलायनरचा पर्याय निवडू शकता. लिक्विड लाइनर लावणे थोडे अवघड आहे. त्यामुळे ते लवकर पसरते. या स्थितीत, आपण पेन लाइनर वापरू शकता. 
 
4 लांब हँडलचे लाइनर वापरणे सोपे आहे, कारण आपण हे सहजपणे हातात पकडू शकता. बर्‍याच लोकांना लहान हँडलच्या ब्रशने लाइनर लावणे कठीण जाते, म्हणून आपण लांब हँडलच्या लाइनरचा वापर करू शकता.
 
5 व्यवस्थित आयलाइनर लावण्यासाठी आपण टेप वापरू शकता. यासाठी आपण टेपचा थोडासा भाग कापून डोळ्यांखाली तिरका लावा. लाइनर लावल्यानंतर टेप काढा. या युक्तीच्या साहाय्याने आपण आयलायनर सहजपणे लावू शकता.