बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 18 जुलै 2024 (17:06 IST)

सौंदर्य सल्ला : पावसाळ्यात तेलकट त्वचा आणि पुरळ दूर ठेवेल मॉइश्चराइजर

moisturizer
वातावरण बदलण्याचा परिणाम त्वचा आणि आरोग्य दोघांवर होतो. खासकरून मान्सूनमध्ये त्वचा ऑईली होते तसेच त्वचेवर पुरळ येण्यास सुरवात होते. वातावरणामध्ये ओलावा असल्या कारणाने त्वचेवर याचा प्रभाव पडतो. चेहऱ्यावर पुरळ दिसायला लागतात. मान्सूनमध्ये त्वचेची खास काळजी घ्यायला हवी. व आपल्या त्वचेकडे व्यवस्थित लक्ष दयायला हवे. 
 
हाइड्रेट रहा-
मान्सूनमध्ये त्वचेला हाइड्रेट ठेवावे. जास्तीतजास्त पाणी सेवन करावे. यामुळे चेहरा ताजा आणि तेजस्वी दिसेल. दिवसातून कमीतकमी सात ते आठ ग्लास पाणी जरूर प्यावे. पाणी त्वचेसोबत आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. 
 
माइल्ड क्लींजर- 
या वातावरणामध्ये चेहऱ्याला वारंवार धुवावे. वातावरणामधील ओलाव्याने त्वचा चिपचिप व्हायला लागते. वारंवार चेहरा धुतल्यास त्वचेमधील धूळ साफ होण्यास मदत मिळते. या वातावरणामध्ये तुमच्या त्वचा नुसार स्किन टोनरचा उपयोग करू शकतात. तुम्ही लाइटवेट क्लींजरचा उपयोग करू शकतात. 
 
फेस मिस्ट- 
फ्लोरल सुगंध आणि सुगंधासोबत तुमची त्वचा उजळ होण्यास मदत होते. यामुळे तुमचा चेहरा तेजस्वी दिसतो. याशिवाय हे त्वचेला हाइड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. 
 
 वॉटर बेस्ड मॉइश्चराइजर- 
तुम्ही त्वचेवर वाटर बेस्ड मॉइश्चराइजरचा उपयोग करू शकतात. या वातावरणामध्ये त्वचेला पोषण मिळण्यासाठी मॉइश्चराइज करणे गरजेचे आहे.  तुम्ही तुमच्या स्किन केयर रुटिन मध्ये मॉइश्चाइजर सहभागी अवश्य करावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik