मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (19:50 IST)

काय सांगता, शरीराचा घाम देखील फायदेशीर आहे

उन्हाळ्यात घाम येण्यामुळे लोक त्रस्त असतात. परंतु घाम येणं देखील निरोगी त्वचेसाठी आवश्यक आहे. असं म्हणतात की घाम त्वचेला तेलकट बनवतो आणि छिद्रांना अवरुद्ध करतो. परंतु हे सत्य नाही. वास्तविक जेव्हा घाम बाहेर येत नाही त्याचा अर्थ आहे की हे छिद्र आधीपासूनच भरलेले आहे. आणि त्वचा मुरुमांच्या ब्रेकआऊट साठी तयार आहे. 
जेव्हा आपल्याला उष्णता जाणवते, घाम येतो तेव्हा तहान लागते आणि  आपण पाणी अधिक प्रमाणात पितो. या मुळे त्वचेला फायदा होतो. चला जाणून घेऊ या की घाम त्वचेसाठी फायदेशीर का आहे. 
 
1 विषारी टॉक्सिन काढण्यात मदत करतात-
 
2 घाम हे शरीरातील विषारी द्रव टॉक्सीनला बाहेर काढण्यात मदत करतात. जेव्हा हे टॉक्सिन घाम म्हणून बाहेर पडत नाही, तेव्हा हे त्वचेला नुकसान देतात. परिणामी मुरूम आणि पुरळ येतात. 
 
3 घाम आल्यावर शरीरातून खनिजे आणि नैसर्गिक मीठ बाहेर येत, जे नैसर्गिक एक्सफॉलिएटर म्हणून काम करतो. हे छिद्र स्वच्छ करतो आणि त्वचेतील घाण आणि अशुद्धेला स्वच्छ करतो, कोरड्या त्वचेची आणि ऍलर्जीची समस्या कमी करतो. 
 
4 चेहऱ्या वरील साचलेली घाण आणि अशुद्धी दूर करतो. 
 
5 घाम हे शरीरातील सर्व घाण आणि मृत त्वचा पेशी बाहेर काढण्यास  तसेच त्वचेला स्वच्छ करण्यात मदत करतो. 
 
6 घाम त्वचेला ताजे करतो.आपण वर्कआउट केल्यांनतर किंवा तेज  चालण्याच्या 1 तासानंतर स्वतःला आरशात बघता, तर त्वचेत वेगळी चकाकी दिसते. ही चकाकी चेहऱ्यावरील येणाऱ्या घामामुळे होते, जे त्वचेवरील साचलेली घाण स्वच्छ करते