1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (08:00 IST)

कॉफी पावडर फेसपॅक ने 5 मिनिटात चेहरा चमकेल

Coffee
आपण केस कोमल आणि चमकदार बनविण्यासाठी ज्याप्रकारे केस कंडीशनिंग करता त्याच प्रकारे त्वचेला कोरडेपणापासून संरक्षण देऊन त्वचा कोमल बनविण्यासाठी त्वचा कंडिशनिंग केली जाते. चला तर मग अशा प्रकारचे एक घरगुती उपचार जाणून घेऊया ज्याद्वारे आपण त्वचेला कंडिशनिंग करून 5 मिनिटात चेहर्‍यावर नैसर्गिक चमक आणू शकता.
 
त्वचा कंडीशनींग करण्यासाठी फक्त दोन गोष्टी लागणार 
 
1 कॉफी
2 गुलाबपाणी
 
कॉफी पावडरमध्ये गुलाब पाणी घालून चांगल्या प्रकारे मिसळा आणि ते आपल्या चेहऱ्यावर लावा. 5 मिनिटं तसेच ठेवा,कोरडे झाल्यावर हळुवार ओल्या हाताने चेहऱ्याची मालिश करा.आता चेहरा थंड पाण्याने धुवा आणि ते कापसाच्या कपड्याने किंवा मऊ टॉवेलने पुसून घ्या आणि आपण स्वतः आपल्या त्वचेतील फरक बघा.आपल्याला जाणवेल की त्वचा चमकत आहे.