शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जुलै 2022 (14:08 IST)

Dark knee home remedy : गुडघे काळे झाले आहेत का, मग हे घरगुती उपाय करा

Dark Knee
Dark knee home remedy : गुडघे काळे होणे खूप सामान्य आहे, ही समस्या कोणालाही होऊ शकते. जास्त उन्हात राहिल्यामुळे गुडघे काळपट होतात. या शिवाय  स्वच्छतेची काळजी न घेतल्यानेही गुडघे काळे पडतात. काही लोक क्रीम लावून काळपटपणा कमी करतात, तर काही घरगुती उपाय अवलंबवतात. गुडघ्याचा काळपटपणा कमी कसं करावे ते जाणून घेऊ या.  
 
गुडघ्याचा काळपटपणा कमी करण्याचे उपाय- 
* गुडघ्यांचा काळेपणा कमी करण्यासाठी खोबरेल तेल खूप प्रभावी आहे. रात्री गुडघ्यावर लावून झोपल्याने काळपटपणा कमी होतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी मसाज करायला विसरू नका.
 
* लिंबू लावल्याने त्याचा काळेपणाही कमी होतो. मधात मिसळून दररोज गुडघ्यांना मसाज करा, व्हिटॅमिन सी गुणधर्म या समस्येपासून लवकर आराम देतात. 
 
* गुडघ्यांचा काळपटपणा कमी करण्यासाठीही दही खूप उपयुक्त आहे. त्वचेचा काळपटपणा कमी करण्यासाठी हे उत्तमरित्या काम करते. असे दररोज केल्यास लवकरच आराम मिळेल.
 
* लिंबूमध्ये मध आणि साखर मिसळून घुडग्यांवर चोळावे. यामुळे त्या गुडघ्याचा  काळपट पणा हळूहळू नाहीसा होऊ लागतो. असे केल्याने तुम्ही या समस्येवर मात कराल.
 
* या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा देखील उपयुक्त आहे. हे फक्त दुधात मिसळून त्या भागात लावा आणि कोमट पाण्याने स्वच्छ करा. 
 
* गुडघ्यांचा काळेपणा हळदीनेही कमी करता येतो.