1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (10:08 IST)

Hair Color हेअर कलर करा पण सांभाळून...

Do hair color but with care हेअर कलर करा पण सांभाळून...
आजकाल मुली असो वा स्त्रिया हेअर कलर करण्याचं क्रेझ वाढलं आहे. सध्या लेटेस्ट रंग वापरून आपल्या पर्सनालिटीला एक वेगळा लुक देता येतो. अलीकडे ब्राऊन, चॉकलेट, बरगंडी आणि ब्लैंड फॅशनमध्ये आहे. त्यातून हायलायटिंगचा ट्रेंड आहे. मात्र केसांना कलर देण्यापूर्वी त्यांचा प्रकार समजून घेणं गरजेचं आहे.
 
कलर करण्यापूर्वी हे करा....
 
* कलर करण्यापूर्वी हेअर कटिंग किंवा ट्रिमिंग करून घ्या.
 
* कलरिंगसाठी दिलेल्या निर्देशांक पुस्तिकेत सांगितल्याप्रमाणे हेअर कलर करण्यापूर्वी ऍलर्जी टेस्ट करून घ्या.
 
* कलर वापरण्यापूर्वी दिलेल्या सूचना नीट वाचून घ्या.
 
* आपल्या केसांवर पूर्वी कधीच रंगांचा वापर केलेला नाही की ते आधीपासूनच रंगलेले आहेत. जे जाणून घेतल्यानंतर योग्य रंगाची निवड करा.
 
* कलर निवडण्यापूर्वी काही शंका असेल तर हेअर एक्सपर्टचा सल्ला घ्या.
 
* कलर करण्यापूर्वी एकाच आकाराचे फॉइल तयार ठेवा. 
 
* अता व्ही शेपमध्ये केस घेऊन त्याचे पातळ सेक्शन करून घ्या. त्याखाली फॉइल ठेवून केसांना कलर करा आणि दोन्ही बाजूने दुमडून फोल्ड करा. हायलाइट एकासारखं असावं हे लक्षात असू द्या.
 
* कलर झाल्यावर अर्ध्या तासाने फॉइल काढा आणि केस धुऊन शेपू करा. केस वाळल्यावर वेगळाच लुक येईल.
 
हे करू नका....
 
* कलर करताना केसांच्या मुळांना कलर लावू नका.
 
* वयाने जास्त असलेल्या स्त्रियांनी डार्क रंगाचा वापर करू नये.
 
* ओल्या केसांमध्ये कलर करू नये याने कलर स्कल्पवर पसरतो.
 
* कलर केलेले केस कधीच गरम पाण्याने धुऊ नये. याने कलर फिकट होऊ लागतो.
 
* दुसर्‍यांचं पाहून रंगाची निवड करू नये. आपल्याला जो शोभेल तोच कलर वापरा.