बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (08:20 IST)

उन्हाळ्यात देखील कूल राहण्यासाठी हे करा

उन्हाळ्यात देखील आपण कूल राहण्यासाठी या उपायांना अवलंबवा. 
सध्या उन्हात गेल्यावर देखील उन्हात चटके बसतात. आपण काही उपाय अवलंबविले तर आपण उन्हात देखील कूल राहू शकता. चला तर मग जाणून  घेऊ या.   
 
1 कूल मिस्ट बनवा-कूल मिस्ट बनविण्यासाठी पाण्याच्या एका बाटलीत पेपरमिंट एक्स्ट्रॅक्टच्या काही थेंब मिसळा. उष्णता जाणविल्यावर या मिस्ट चा वापर करा.या मुळे आपल्याला थंडावा मिळेल. 
 
2  मनगट ओलं करा- असं केल्याने त्वरितच थंडावा मिळेल आपल्या मनगटाला पाण्याने ओलं करा. थंडावा मिळेल .या मागील कारण असे आहे की आपल्या मनगटाच्या नसा त्वचेच्या जवळ असतात आणि थंड पाणी आपल्या शरीराच्या तापमानाला खाली नेतो या मुळे आपल्याला थंडावा जाणवतो.
 
3 बर्फाने जमलेली बाटली पंख्याच्या समोर ठेवा- असं केल्याने पंख्याच्या हवेमुळे थंड वारं मिळेल आणि आपल्याला उकाडा जाणविणार नाही.    
 
4 कोरफड वापरा- त्वचेच्या थंडावा साठी कोरफड जेल काढून आईस ट्रे मध्ये जमवून ठेवा नंतर सनबर्न होण्याचा ठिकाणी लावा आराम मिळेल.