रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (22:04 IST)

कोरोनामुळे बुधवारपासून औरंगाबादमधील हॉटेल व्यवसाय बंद

औरंगाबाद शहरातील हॉटेल्स पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनानं घेतला आहे. 17 तारखेपासून म्हणजे बुधवारपासून औरंगाबाद शहरातील हॉटेल व्यवसाय बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. दरम्यान, हॉटेलमधील पार्सल सुविधा सुरु ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
औरंगाबादेत कोरोना रुग्णांच्या संख्या सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे औरंगाबादेत विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लॉकडाऊन असणार आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि एमआयडीसी वगळता सर्व बंद राहणार आहे. विशेष म्हणजे या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी शहरात शेकडो पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. 
 
- औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था (कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था) व इतर तत्सम संस्था बंद राहतील.
- सर्व प्रकारच्या धार्मिक सभा, राजकीय सभा, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, मिरवणुका, आंदोलने, मोर्चे, धरणे, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम यावर प्रतिबंध
- आठवडी बाजार, जलतरण तलाव (Swimming Pool), क्रीडा स्पर्धा बंद राहतील.
- सर्व प्रकारची सभागृहे, मंगल कार्यालये, लॉन्स पूर्णपणे बंद राहतील.
- कोणत्याही सार्वजनिक विवाह समारंभास परवानगी असणार नाही.
- औरंगाबाद शहरातील जाधवमंडी 11 मार्च ते 17 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहील.