शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (20:42 IST)

आमदार नितेश राणे यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार : वरूण सरदेसाई

भाजपा आमदार नितेश राणे यांनी  सचिन वाझे प्रकरणावरून  केलेल्या आरोपांना  युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी पत्रकारपरिषदेत उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल परब यांची देखील उपस्थिती होती. ”भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकारपरिषद घेऊन, माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केले, हे सगळे आरोप हे तथ्यहीन असून  त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार आहे. त्यांनी जे काही आरोप केले, हे त्यांनी सिद्ध करावे अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला त्यांनी सामोरं जावं.” असा इशारा वरूण सरदेसाई यांनी दिला आहे.
वरूण सरदेसाई म्हणाले, ”मी एका अतिशय सुसंस्कृत व उच्चशिक्षित कुटुंबातून येतो, मला कुठंतरी राजकारणाची आवड आहे. म्हणून मी युवासेनेचं शिवसेनेचं काम करतो. आज जे काही घाणेरडे आरोप करण्यात आले आहेत, अशी काम करण्याची माझी इच्छा नाही व माझ्या हातून तसं घडणार देखील नाही. मी माझ्या कुटुंबाची संपूर्ण पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्या राणे कुटंबाची पार्श्वभूमी मला वाटतं सर्वश्रुत आहेच. मग अगदी त्यांची ती सुरूवातीची गँग असो व नंतर त्यांच्यावर असंख्य अगदी गंभीर गुन्हे खून, अपहरण, खंडणी असे विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. त्या कुटुंबावर दाखल आहेत. या सगळ्याचा पाढा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत मांडला आहे, तो रेकॉर्डवर देखील आहे.”