शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (19:05 IST)

टॉवेलने केस कोरडे करतं असाल तर ही चूक करू नये

do not rub your hair with a towel
प्रत्येकाची सवय असते की केसांना धुतल्यावर त्यामधील जास्तीचे पाणी काढून टाकण्यासाठी टॉवेलचा वापर करतो आणि आपले केस टॉवेलने पुसून कोरडे करतो. आता पर्यंत आपण सगळे ही पद्धत बघत आलो आहोत आणि अवलंबवत आहोत. परंतु आपणास हे माहीत आहे का, की केसांना टॉवेलने पुसण्याची पद्धत योग्य नाही. या मुळे केसांना एक नव्हे तर अनेक प्रकाराने नुकसान होतात. जाणून घेऊ या बद्दल माहिती.
 
* केस तुटणे -
केसांचे तज्ज्ञ सांगतात की आपण केस धुता, त्यावेळी केसांचे मूळ कमकुवत होतात आणि टॉवेलने केस पुसल्यावर ते तुटतात. आपण टॉवेलने केस वाळवल्यावर टॉवेलवर केस बघितलेच असणार. या शिवाय आपले केस फ्रिजी होतात. 
 
* दोन तोंडी केस -
दोन तोंडी केस अजिबात चांगले दिसत नाही आणि अशा परिस्थितीत दोन तोंडी केस नाहीसे करण्यासाठी आपण केस कापवितो. पण आपल्याला हे माहीत आहे काय की केस दोन तोंडी होण्याची सुरुवात तेव्हा पासून होते जेव्हा आपण टॉवेलने केस चोळून पुसणे सुरू करता. 
त्या वेळी केस शाफ्ट रफ होतात आणि केसांचे दोन टोक होण्याची समस्या वाढते. जर आपल्या केसांमध्ये ही समस्या उद्भवू नये असे वाटत आहे तर आपण देखील टॉवेलने केस पुसण्याचा या सवयीला सोडून द्या.
 
* केस कोरडे होणं -
केसांचे तज्ज्ञ सांगतात,की केसांना टॉवेलने चोळून चोळून पुसल्यानं त्यामधील कोरडेपणा वाढतो. जेव्हा आपण केसांना धुता तर पाण्यासह त्याचा नैसर्गिक ओलावा देखील शोषला जातो आणि केस अधिकच रुक्ष आणि निर्जीव वाटतात.
 
* योग्य पद्धत -
लहानपणापासूनच आपण सर्वांनी केसांना टॉवेलने कोरडे करण्याची पद्धतच शिकली आहे, म्हणून हे आवश्यक आहे की हे माहीत असणे की केसांना कशा प्रकारे कोरडे करावयाचे आहे ,जेणे करून त्यांना काहीच नुकसान होता कामा नये.
 
केसांची निगा राखणारे तज्ज्ञ सांगतात की या साठी आपण एक सुती टीशर्ट किंवा मायक्रोफायबर टॉवेलने केसांना गुंडाळा काही वेळ तसेच ठेवा या मुळे ते टीशर्ट जास्तीचे सर्व पाणी शोषून घेईल अन केस कोरडे होतील.