केसांचा चिकटपणा दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा
उन्हाळ्यात, घाम, धूळ आणि सूर्यप्रकाशामुळे केसांना खूप त्रास होतो. तर दुसरीकडे घामामुळे केसांना चिकटपणा येतो.सूर्यप्रकाशामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. या मुळे केसांच्या समस्या उदभवतात.
आपल्या शरीराप्रमाणे केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. केस हे आपल्या सौंदर्याचा एक भाग आहे. उन्हाळ्यात केस घामामुळे चिकट होतात. त्यात खाज येते. हे दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा
उन्हाळ्यात दिवसभर सूर्यप्रकाश आणि घामामुळे केस खराब होतात. त्यामुळे धुतल्यानंतरही ते चांगले होत नाहीत, तर आणखी कोरडे होतात. अशा स्थितीत झोपण्यापूर्वी केसांना मोहरी, नारळ किंवा ऑलिव्ह ऑइलने मसाज करा. ज्यामुळे तुमच्या केसांचा कोरडेपणा दूर होईल.आणि केस उन्हामुळे खराब होण्यापासून वाचतील.
तेल लावल्यानंतर शॅम्पूने केस धुवा आणि नंतर किंचित ओल्या केसांवर सीरम वापरा. यामुळे तुमचे केस चमकदार दिसतील.आपण आठवड्यातून एकदा हेअर मास्क वापरू शकता. हे तुमच्या केसांना खोल स्वच्छता तसेच हायड्रेशन प्रदान करेल.
केस मजबूत आणि चमकदार करण्यासाठी घरीच केळी मॅश करा. त्यात दही आणि मध घालून पेस्ट बनवा. ते केसांना पूर्णपणे लावा, अर्धा तास ठेवा आणि नंतर केस धुवा.
हे घरगुती उपाय केल्याने केसांचा चिकट्पणा दूर होईल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited by - Priya Dixit