शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 8 एप्रिल 2024 (17:30 IST)

कॉफीचा वापर करून डार्क सर्कल्स करा दूर, जाणून घ्या पाच सोप्या टिप्स

Coffee For Dark Circles
Coffee For Dark Circles: डार्क सर्कल्स ही एक सामान्य समस्या आहे. जी डोळ्यांच्या खालील त्वचेला काळे किंवा निळे बनवते. हे थकवा, तणाव, वय वाढणे किंवा शारीरिक आरोग्य व्यवस्थित नसले तर यामुळे होते. जे तुम्हाला आजारी आहे असे दाखवते. असे काही काही घरगुती ऊपाय आहे ज्यामुळे डार्क सर्कल्स कमी व्हायला मदत होते. कॉफी हा एक असा उपाय आहे जो डार्क सर्कल्सला कमी करण्यासाठी मदत करतो. कॉफीमध्ये कॅफिन असते, जे एक अँटीऑक्सिडेंट आहे. अँटीऑक्सिडेंट हे मुक्त कणांशी लढायला मदत करते. ज्यामुळे डार्क सर्कल्स कमी होतात. डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी कॉफीचा उपयोग कसा करावा जाणून घ्या टिप्स 
 
1. कॉफी ग्राउंड आयमास्क- 
ताजी बारीक केलेली कॉफी एक मोठा चमचा भरून घ्या आणि थोडया पाण्यासोबत मिसळून पेस्ट तयार करा. या पेस्टला डोळ्यांच्या खाली लावा. तसेच 10 ते15 मिनिटांकरिता तसेच राहू द्या. मग थंड पाण्याने धुवून घ्यावे. या मास्कचा उपयोग आठवडयात 2-3 वेळेस करावा. 
 
2. कॉफी आयक्रीम-
एका बाऊलमध्ये 1 मोठा चमचा ताजी बारीक केलेली कॉफी आणि 1 मोठा चमचा अनसाल्टेड लोणी मिक्स करा. नंतर डोळ्यांच्या खाली लावावे. या आईक्रीमला रात्री लावून ते तसेच रात्रभर ठेवावे. तसेच चांगले परिणाम मिळण्यासाठी नियमित वापर करा. 
 
3. कॉफी क्यूब्स- 
ताजी बारीक केलेली कॉफी 1 कपमध्ये घ्या आणि ती 1 कप पाणीमध्ये उकळा. हे मिश्रण थंड झाल्यानंतर आइसक्यूब ट्रे मध्ये टाका. आइस क्यूब्सला जमू द्यावे. मग तुमच्या डोळ्यांच्या खालील जागेवर कॉफीच्या आइस क्यूबने दिवसातून दोनवेळेस मॉलिश करावी. हे रक्त वाहिन्यांना सुरळीत करून डार्क सर्कल्सला कमी करते. 
 
4. कॉफी टी बॅग्स-
दोन कॉफी टी बॅग्सला गर्म करून पाण्यामध्ये 5 मिनिटांसाठी भिजवा. टी बॅग्सला थंड करण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर डोळ्यांवर 10 ते 15 मिनिट ठेवा. मग टी बॅग्सला काढून टाका आणि थंड पाण्याने धुवून घ्या. हा उपाय दिवसातून 2 ते 3 वेळेस करावा. 
 
 
5. कॉफी आणि एलोवेरा जेल- 
1 मोठा चमचा ताजी बारीक केलेली कॉफी आणि 1 मोठा चमचा एलोवेरा जेल मिक्स करा. यानंतर हे मिश्रण डोळ्यांच्या खालील क्षेत्रावर लावावे. 15-20 ते मिनिटांसाठी लावून ठेवा नंतर थंड पाण्याने धुवून घ्यावे. या मास्कचा उपयोग आठवडयातून 2-3 वेळेस करावा. 
 
सावधानी 
जर तुम्हाला कॅफिनची एलर्जी असेल तर, कॉफीचा उपयोग डार्क सर्कल्स वर उपचारसाठी करू नये. कॉफीला डोळ्यांमध्ये जाऊ देऊ नका. जर असे झाले तर, लगेच आपल्या डोळ्यांना पाण्याने धुवावे. जर तुम्ही कॉफीचा उपयोग केल्यानंतर जळजळणे किंवा लाल होणे यापैकी काही समस्या येत असले तर उपयोग करू नका. कॉफी डार्क सर्कल्सला कमी करण्यासाठी एक प्रभावी घरेलू उपचार आहे. कॅफिन आणि अँटीऑक्सिडेंटची आपल्या साहित्यामुळे कॉफी रक्त वाहिन्यांना मुक्त कणांशी लढायला मदत करते. डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी कॉफीचा उपयोग करण्याकरिता वरील टिप्स अवलंबवा.   
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
Edited By- Dhanashri Naik