शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 12 जानेवारी 2019 (16:35 IST)

चमकदार केसांसाठी घरीच तयार करा हेयर सीरम

केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि वाढीसाठी तुम्हाला अनेक हेयर एक्सपर्टस्‌ किंवा तज्ज्ञांकडून हेयर सीरम वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. हेयर सीरम एक असं लिक्विड असतं, ज्यामध्ये अमीनो अ‍ॅसिड, सिरोइड आणि सिलिकॉन असतं. परंतु, तुम्ही तुमच्या घरीच वेगवेगळ्या तेलांचा वापर करून हेयर ग्रोथ सीरम तयार करू शकता. 
 
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, तुम्ही तुमच्या डोक्याची त्वचा आणि केसांचं आरोग्य लक्षात घेऊन सीरम तयार करू शकता. 
 
जर तुमच्या केसांसोबत तुमची डोक्याची त्वचाही कोरडी असेल तर तुम्ही बदामाचं तेल, ऑर्गन तेल आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करून एक उत्तम हेयर सीरम तयार करू शकता. त्यांना योग्य प्रमाणात एकत्र करून केसांच्या मुळांना मसाज करा. मसाज केल्यानंतर गरम पाण्यामध्ये टॉवेल भिजवून त्यातील पाणी काढून घ्या आणि केसांना वाफ द्या. त्यामुळे सीरम केसांच्या मुळांसोबतच डोक्याच्या त्वचेमध्ये मुरण्यासही मदत होईल. लक्षात ठेवा की, तुम्हाला याचा पूर्ण फायदा घेण्यासाठी नियमितपणे डोक्याला मसाज करणं आवश्यक असेल. 
 
जर तुमच्या डोक्याची त्वचा आणि केस आधीपासूनच ऑयली असतील तर त्यांना तेल लावण्याचा काही फायदा नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की, त्यांना मॉयश्चरची गरज नसते. त्यासाठी तुम्हाला दोन टेबलस्पून अ‍ॅलोवेरा जेल, एक टेबलस्पून बेकिंग सोडा, दोन चमचे गुलाब पाण्यासोबत एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. तयार पेस्टने डोकं आणि केसांना मालिश करून 10 मिनिटांसाठी तसचं ठेवा. त्यानंतर केस धुवून टाका. 
 
केसांच्या वाढीशी निगडीत समस्यांसाठी बदामांचं तेल सर्वात फायदेशीर ठरते. तसेच मध केसांना पोषण देण्यासोबतच सूक्ष्णजीवांची वाढ करण्यापासून रोखतं. त्यामुळे मध आणि एक चमचा बदामाचं तेल एकत्र करून 30 मिनिटांसाठी केसांना लावा. त्यानंतर केस धुवून टाका.