शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 9 जानेवारी 2019 (17:31 IST)

जिम आणि व्यायाम न करता वजन कमी करा

आज वजन कमी करणे हा लोकांसाठी सर्वात मोठे कार्य आहे. काही लोक कितेक वर्ष व्यायाम करतात आणि व्यायामशाळेत तासंतास घालवल्यानंतर देखील वजन कमी करण्यात यशस्वी होत नाही. परंतु आज आम्ही अशा प्रकारच्या आहाराबद्दल आपल्याला सांगणार आहोत, ज्याचा दररोज वापर केल्याने तुमचे वजन काही दिवसातच कमी होणे सुरू होईल. अलीकडील संशोधनात असे उघड झाले आहे की योग आणि व्यायाम करणार्‍या लोकांपेक्षाही जास्त लवकर त्या लोकांचा वजन कमी होत जे चांगला आहार घेतात. म्हणून आपल्या आहारात जास्तकरून अशा प्रकारच्या भाज्या समाविष्ट करणे चांगले आहे, ज्याचे सेवन केल्याने कॅलरी वाढत नाही पण जास्त पोषण मिळतं कारण कॅलरी हा लठ्ठपणाचा सर्वात मोठा कारण आहे.
 
आपल्यापैकी बरेच लोक साखर अधिक वापरतात. त्यांना कदाचित याबद्दल माहिती नसते की आपल्या शरीरातील अनेक रोगांचे कारण साखरच आहे. म्हणून साखरेचा  वापर कमी करणे आपल्यासाठी चांगले आहे. दूध चहाऐवजी ग्रीन टी घ्यावी. आपल्या आहारात जास्तीत जास्त फळे, भाज्या, बीन्स, नट्स, ब्रोकोली, चिकन, अंडी सारख्या 
निरोगी गोष्टींचा समावेश करा. हे आपल्याला निरोगी ठेवेल आणि आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटेल.