बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

बर्फाने वाढेल चेहर्‍याचा ग्लो

* रोज 3 ते 4 मिनिट बर्फाने चेहर्‍याची मसाज करा. याने ब्लड सर्कुलेशन सुधारेल आणि स्कीनचा ग्लो वाढेल.
* रोज 2-3 बर्फाचे तुकडे खाल्ल्याने वजन कमी होईल.
* जळलेल्या त्वचेवर लगेच बर्फाचे तुकडे ठेवावे. जळजळ कमी होते आणि छाले पडत नाही.
* रात्री झोपण्यापूर्वी बर्फाने चेहर्‍याची मसाज केल्याने पिंपल्स दूर होतात.
* अधिक वेळेपर्यंत कंप्यूटरवर काम केल्यानंतर डोळ्यांवर आईस क्यूब ठेवावे. गारवा आणि आराम मिळेल.

* बॅक पेन किंवा संधिवात असलेली जागा बर्फाने शेकावी. वेदनांपासून मुक्ती मिळते.
* इंजेक्शन लावल्यानंतर वेदना आणि सूज कमी करण्यासाठी त्या जागेवर बर्फ घासावे.
* लहान-सहान जखमेवर आईस क्यूब ठेवल्याने रक्ताचा प्रवाह थांबेल आणि वेदना कमी होतील.
* पायात लचक आल्यास कपड्यात बर्फ गुंडाळून त्या जागेवर ठेवावे. सूज आणि वेदना कमी होईल.
* झोपण्यापूर्वी बर्फाने चेहर्‍यावर मसाज केल्याने स्किन टाइट होईल आणि हेल्थी राहील.
 

* मसल्समध्ये ताणलेल्या असल्यास कपड्यात आईस क्यूब गुंडाळून त्या जागेवर ठेवावे. आराम मिळेल.
* दात दुखत असल्या किंवा हिरड्यावर किंवा गालावर बर्फाचा तुकडा ठेवल्याने दातांना गारवा मिळतो. 
* फास टोचल्यास त्या जागेवर आईस क्यूब ठेवून ती जागा सुन्न करावी, ज्याने फास काढताना वेदना होत नाही.
* रोज रात्री डोळ्याच्या जवळपास आईस क्यूबने मसाज केल्यास डार्क सर्कल्स आणि टॅनिंगची समस्या दूर होईल.
* डोके दुखीत थोड्या वेळ आईस क्यूबची पोटली बांधावी आणि डोक्यावर ठेवावी. आराम मिळेल.