शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 6 फेब्रुवारी 2024 (16:08 IST)

Valentine Day च्या दिवशी ग्लोइंग त्वचा हवी असेल तर हे ज्यूस सेवन करा

7 दिवस रोज हे ज्यूस सेवन करा चेहऱ्यावर चमक येईल. 
वेलेंटाइन डे च्या दिवशी सुंदर दिसण्यासाठी हे ज्यूस सेवन करा. 
फक्त सात दिवसात चेहऱ्यावर ग्लो येईल. 
मुरुम आणि सुरकुत्या समस्यांपासून आराम मिळेल.
 
Valentine Day Skincare  वेलेंटाइन डे वीक सुरु झाला आहे. जोडप्यांसाठी हे दिवस खूप खास असतात. कारण या दिवशी तुम्ही तुमच्या प्रेमाची कबूली जोडीदार जवळ देतात हे दिवस प्रत्येक जोडीदार आनंदाने साजरे करतात. या खास दिवसांमध्ये तुम्ही पण छान दिसण्याचा प्रयत्न करतात. अशात मेकअप पेक्षा जास्त गरजेचे आहे की तुमची त्वचा आतून ग्लो करावी. ग्लोइंग स्किनच्या मदतीने तुम्ही तुमच्या सुंदरतेला अजुन चांगले बनवू शकतात. चला जाणून घेऊ या ज्यूस बद्दल 
 
ग्लोइंग स्किनसाठी हे ज्यूस सेवन करणे 
ग्लोइंग स्किनसाठी ABC ज्यूस फायदेशीर असते. या ज्यूस मध्ये A म्हणजे सफरचंद, B म्हणजे बीट आणि C म्हणजे गाजर. या तिघांना मिळुन ABC ज्यूस बनवले जाते या ज्यूस मध्ये जिंक, पोटॅशियम, कॅल्शियम, कॉपर, आयरन, मैगनीज आणि विटामिन A, B6, B12, C, D, E सारखे महत्वपूर्ण पोषक तत्व असतात. 
 
ABC ज्यूसचे फायदे 
1. ग्लोइंग त्वचा- या ज्यूस चे नियमित सेवन केल्याने तुमची त्वचा  ग्लो करेल सोबतच त्वचेच्या समस्या कमी होतील या ज्यूसमध्ये भरपूर मात्रामध्ये विटामिन C,A,E आणि आयरन सारखे तत्व असतात. जे त्वचेला चमकण्यासाठी मदत करतील. 
2. डार्क सर्कलपासून आराम-  जर तुम्ही डार्क सर्कलच्या समस्येमुळे चिंतित आहात तर तुम्हाला या ज्यूसचे सेवन करणे गरजेचे आहे. आयरनच्या कमी मूळे डार्क सर्कलची  समस्या निर्माण होते. या ज्यूसच्या सेवनमुळे काही दिवसातच डार्क सर्कल कमी होतील. 
3. पुरळ पासून आराम- जर तुम्हाला पुरळ किंवा मुरुमची समस्या असेल तर हे ज्यूस सेवन करू शकतात. ABC हे ज्यूस शरीरातील रक्त साफ करायला मदत करते व पुरळची समस्या कमी होते. व पाचनतंत्र सुरळीत करते, मेटाबोलिज्म ला वाढवते ज्यामुळे पोट साफ राहते. 
4. त्वचेच्या रंगा मध्ये सुधार- या ज्यूसच्या सेवनाने तुमच्या त्वचे मध्ये सुधारणा होईल या ज्यूसने तुम्ही तुमच्या त्वचेला ग्लोइंग बनवू शकतात. 

Edited By- Dhanashri Naik