शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 (13:22 IST)

Skin Care Tips: सुंदरतेत वाढ होण्यासाठी मटारचा उपयोग करा. जाणून घ्या कसा करायचा उपयोग

थंडीचे दिवस सुरु आहे. अशात भरपूर प्रमाणात तुम्हाला हिरवे मटार मिळतील या सीजन मध्ये मटार स्वस्त मिळतात. कदाचितच असा एखादा व्यक्ती असेल ज्याला मटार आवडत नसतील. लोक या सीजनमध्ये प्रत्येक पदार्थात मटार टाकतात. तसे पाहिले तर मटार शरीराला खूप फायदेशीर असतात. मटारच्या उपयोगाने तुमचा चेहरा चमकदार बनतो मटार मध्ये खूप असे तत्व असतात ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा जातो मटार पासून दोन प्रकारचे फेसपॅक बनवू शकतात ज्यामुळे कमी पैशात तुमचा चेहरा ग्लो करेल याचा वापर करने पण सोपे आहे तर चला  स्किन केयर मध्ये मटारचा उपयोग कसा करायचा जाणून घ्या. 
 
मटार  आणि हळद फेसपॅक-
साहित्य 
2 कप वाफवलेले मटार 
2 चमचे मध 
2 चमचे चंदन पावडर 
2 चमचे दही 
1 चमचा हळद 
1 चमचा एलोवेरा जेल 
अर्धा लिंबाचा रस  
या फेसपॅकला बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी एका वाटीत मटारची पेस्ट तयार करायची आहे. यानंतर त्यात  मध, एलोवेरा, चंदन पावडर, दही आणि लिंबू हे टाकून यांचे मिश्रण तयार करा. मग हे चेहऱ्यावर आणि मानेवर 20 मिनिट लावून ठेवा व नंतर चेहरा धुवून टाका चेहरा धुतल्या नंतर चेहऱ्यावर क्रीम जरूर लावा. 
 
मटार आणि पपईचा  फेसपॅक-
साहित्य 
2 कप मटार 
1 कप कापलेली पपई 
2 चमचे गुलाबजल 
1 चमचा चंदन पावडर 
याचा फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी मटार आणि पपईला चांगले बारीक वाटून घ्यायचे आहे. यानंतर या पेस्ट मध्ये गुलाबजल आणि चंदन पावडर टाकून एकत्रित करा. हा फेसपॅक लावण्या पूर्वी कच्च्या दुधाने चेहरा साफ करून घ्या. आता फेसपॅकला चांगल्या प्रकारे चेहरा आणि मानेवर लावा. 20 मिनिटा नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस हा उपाय करू शकतात. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होईल.