शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (21:34 IST)

एक्ने दूर करण्यासाठी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी घरीच बनवा या नैसर्गिक क्रीम

ग्लोइंग स्किन प्रत्येकालाच हवी असते, पण चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर ग्लोइंग स्किनही निस्तेज दिसू लागते. अशा परिस्थितीत सर्वप्रथम त्वचेवरील डाग काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे. डाग काढून टाकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नैसर्गिक पद्धती वापरणे. त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत आणि ते परवडणार देखील. चला तर मग या टिप्स जाणून घेऊ या .
 
1 दुधआणि कोरफड जेल क्रीम -दूध आणि कोरफड जेलपासून बनवलेल्या क्रीमचा वापर करून चेहऱ्यावरील डाग दूर करू शकता . यासाठी  दोन चमचे कोरफड  जेलमध्ये कच्चे दूध मिसळून ते ढवळत राहावे लागेल. मिक्स केल्यानंतर काही वेळाने हे मिश्रण क्रीम स्वरूपात येईल. जर आपली त्वचा एक्नेची असेल तर  त्यात ट्रीऑइल चे 2-3 थेंब देखील घालू शकता. यामुळे एक्ने  होणार नाहीत आणि जर आपल्या चेहऱ्यावर ऍक्‍टीव्ह एक्ने असतील तर तेही हळू हळू दूर होतील. हे क्रीम सुमारे 10 दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येते.
 
2 बीटरूट आणि एलोवेरा जेल क्रीम -बीट हे आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. बीटरूट आणि एलोवेरा जेल क्रीम बनवण्यासाठी बीटरूटचा रस काढून घ्या. यासाठी बीट किसून कापडात ठेवा आणि दाबून बीटचा रस काढा. त्यानंतर हा रस एक चमचा कोरफड जेलमध्ये घेऊन चेहऱ्याला लावा. यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसेल.