शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018 (12:38 IST)

चेहर्‍यावरचे काळे दाग मिटवण्यासाठी पपई-काकडीने खुलवा सौंदर्य

पपई व काकडी आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. काकडी व पपईचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश असल्याने आपली पचनक्रिया सुरळीत होत असते. तसेच आपले सौदंर्य आबादीत ठेवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत असते.
 
आपल्या रोजच्या आहारात सलादमध्ये पपई, काकडी, टोमॅटो, कांदा, गाजर यांचा समावेश असवा. आदी फळे भाज्या नियमित खाल्याने आरोग्य उत्तम राहून सौंदर्य खुलत असते. 
 
धूळ व धूरामुळे आपल्या चेहर्‍यावर काळे दाग पडले असतील तर त्यावर आपण काकडी किंवा पपईचा मगज लावून ठेऊ शकतो. त्यानंतर चेहरा पाण्याने धुतल्यावर चेहरा खुलतो व त्वचाही मुलायम होत असते.