शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (15:59 IST)

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर तीळ

तीळ आरोग्यासाठी उत्तम असल्याचे तर आपल्या माहितच असेल तसेच सौंदर्य वाढविण्यासाठी देखील हा एक उत्तम पर्याय आहे. 
 
तिळाच्या पॅकने पिंपल्स, ऐक्ने आणि डार्क पॅचचे घटक निघून जातात. तिळाचे अँटी-बॅक्टेरिया, अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. रात्री झोपताना चेहऱ्यावर तीळ तेल लावल्याने सुरकुत्यापासून मुक्ती मिळते. तिळाचा प्रयोग चेहर्‍यावर चमक आणण्यासाठी देखील केला जातो. दुधात तीळ भिजवून ते तोंडावर लावण्याने चेहर्‍यावर नैसर्गिक चमक येते आणि रंग देखील चमकतो. याशिवाय, तिळाच्या तेलाने मालीश केल्याने त्वचा मऊ होते. 
 
हिवाळ्यात, तीळ शरीरात ऊर्जा प्रसारित करते, आणि तेल मालीश वेदनेतून आराम देते.
 
तसेच नियमित केसांना तिळाचे तेल लावल्याने केस मजबूत होतात कारण केसांना मुळांपासून सामर्थ्य मिळते. याव्यतिरिक्त केसांची चमक वाढते. हिवाळ्यात कोंड्याची समस्या अधिकच वाढते अशात तिळाचे तेल लावल्याने लगेच फायदा दिसून येतो. केस गळतीवर देखील तिळाचे तेल फायद्याचे आहे. 
 
विशेष: तिळाचे अधिक प्रमाणात वापर धोकादायक ठरु शकतं अशात आपल्या आधी याचे उटणे किंवा तेल नुकसान तर करत नाहीये याची खात्री करुन घ्याी तसेच केसांना तेला लावल्याच्या अर्धा तासात केस धुऊन घ्यावे.