बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (08:50 IST)

Skin Care Tips : उन्हाळ्यात कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी हे 5 उपाय अवलंबवा

कोरोना कालावधीत, घरीच राहूनही त्वचा खूप कोरडी व निर्जीव होऊ लागली आहे. बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की घरी राहून त्वचा चांगली राहील तर अस काही नाही.घरात राहून देखील आपल्याला त्वचेची काळजी घ्यावीच लागणार.चला तर मग जाणून घेऊ या की कोरोना काळात आपण त्वचेला ताजेतवाने कसे ठेवाल.
 
1 दही-हरभरा डाळीचे पीठ -जर आपली त्वचा रुक्ष झाली आहे तर दही आणि हरभराडाळीचे फेसपॅक लावा. हे लावल्याने आपली त्वचा मऊ होईल. या साठी 1 वाटीत 2 चमचे दही आणि 1 चमचा हरभराडाळीचे पीठ घेऊन त्यांना मिसळा आणि हे पॅक चेहऱ्यावर लावून घ्या.15 मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या.आठवड्यातून हे 2 वेळा करा.
 
2 कोरफड आणि बोरोप्लस -पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होते.पाणी पिऊन देखील त्वचा सामान्य होण्यासाठी वेळ लागतो.तो वर आपण दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेल सह बोरोप्लस मिसळून चेहऱ्यावर लावून झोपा.सकाळी त्वचा मऊ होईल.
 
3 उटणे आणि ऑलिव्ह तेल-एका वाटीत 2 चमचे हरभराडाळीचे पीठ,1 चमचा गव्हाचं पीठ,2 चिमूट हळद,अर्धा लिंबू,2 केसरच्या कांड्या,थोडस दूध,1 चमचा मलई,1 चमचा ऑलिव्ह तेल किंवा साधं तेल .हे सर्व मिसळून चेहऱ्यावर हे पॅक लावा 5 मिनिटानंतर चोळून काढून घ्या. या मुळे चेहरा चमकेल या नंतर ऑलिव्ह तेलाने चेहऱ्यावर आणि शरीरावर मॉलिश करा. 
 
4 पपई आणि मधाचा पॅक -उन्हाळ्यात त्वचा तजेल ठेवण्यासाठी पपईचा फेसपॅक आवर्जून लावा.या साठी एका वाटीत पपईचे गीर काढून त्यात 1 चमचा मध मिसळा आणि 30 मिनिट हे पॅक चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.
 
5 लिंबू-मलई -हे आपल्याला रात्री झोपळण्यापूर्वी लावायचे आहे.एका वाटीत,1 चमचा मलई आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावून झोपून जा.सकाळी उठल्यावर आपली त्वचा मऊ होईल आणि रुक्षपणा जाणवणार नाही.