शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 28 फेब्रुवारी 2021 (08:25 IST)

कडकडीत उन्हापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी हे उपाय करा

जेव्हा उन्हाच्या तीव्र उष्णतेत बाहेर पडतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. तापमान उष्ण असल्यामुळे चेहरा जळतो आणि निस्तेज दिसतो. अशा परिस्थितीत चेहऱ्याला तजेल आणि टवटवीत करण्यासाठी काही गोष्टीना वापरून चेहरा तरुण आणि तजेल करू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या. कोणत्या आहेत त्या खास गोष्टी ज्यांना उन्हाळ्यात वापरावे.   
 
* फेस मिस्ट -
जेव्हा आपण ऑफिसात किंवा घराच्या बाहेर असाल तेव्हा आपल्या जवळ फेस मिस्ट बाळगा.प्रत्येक 1-2 तासानंतर चेहऱ्यावर ह्याचे स्प्रे करा. या मुळे त्वचा हायड्रेट राहील आणि चेहरा निस्तेज देखील दिसणार नाही. सध्या बाजारपेठेत बरेच फेस मिस्ट आढळतात. किंवा आपण हे घरात देखील बनवू शकता.या साठी  गरज आहे काही गुलाबाच्या पाकळ्यांची आणि 1 लीटर पाण्याची. सकाळी एका भांड्यात पाणी उकळवून त्या मध्ये गुलाबाच्या पाकळ्या घालून रात्रभर ठेवा.नंतर सकाळी हे पाणी एखाद्या स्प्रे च्या बाटलीत गाळून भरून घ्या. फेस मिस्ट तयार आहे.  
 
* कुलिंग फेस पॅक -
चेहऱ्यावर उन्हाने टॅनिग झाली आहे किंवा जळजळ होता आहे तर हे कुलिंग फेस पॅक आराम देतो. या साठी गरज आहे टोमॅटो आणि मधाची. टोमॅटो वाटून त्यामध्ये मध मिसळा हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटे तसेच राहू द्या. जर आपला चेहरा तेलकट आहे आणि उष्णते मुळे तेल निघत आहे तर या पॅक मध्ये थोडंसं हरभराडाळीचे पीठ मिसळा. हे चेहऱ्यावरील जास्तीचे तेल काढून टाकते. 
 
* आईस क्यूब- 
हे त्वचेला थंडावा  देण्यासाठी खूप कामी येतो .हे चेहऱ्यावर लावल्यानं आराम मिळतो चेहरा थंड करण्यासाठी कोरफड जेलच्या रसाला आईस ट्रे मध्ये जमविण्यासाठी ठेवा. हे  त्वचेला थंड करण्यासह फायदा देई