गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 17 मार्च 2021 (08:40 IST)

सुंदर आणि तजेलदार त्वचेसाठी चंदनाचे फेसपॅक वापरा

त्वचेला सुंदर आणि चमकदार बनविन्यसाठी चंदनाचा फेसपॅक चांगला आहे. हे त्वचेला मऊ आणि नितळ बनवतो. तसेच चेहऱ्यावरील डाग देखील नाहीसे करतो. चला तर मग चंदनाचा फेसमास्क कसा बनवायचा हे जाणून घेऊ या. 
 
*चेहऱ्यावरील मुरुमाच्या त्रासाला कमी करण्यासाठी चंदन पावडरचा लेप लावा. चंदन पावडर आणि गुलाब पाणी सम प्रमाणात मिसळून चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे तसेच ठेवा हे त्वचेला  थंडावा देईल. या मुळे त्वचेवरील पुटकुळ्या,पुरळ आणि मुरूम देखील नाहीसे होतात. 
 
* अँटीएजिंग साठी चंदन फायदेशीर आहे अँटीएजिंग फेसपॅक बनविण्यासाठी अंडी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा मध आणि एक चमचा चंदनपावडर मिसळा. नंतर ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावा. कोरडी झाल्यावर धुवून घ्या. या मुळे चेहरा घट्ट होईल आणि सुरकुत्या पडणार नाही. 
 
* कच्च्या दुधात अर्धा चमचा चंदन पावडर मिसळून संपूर्ण चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे तसेच ठेवा. कोरडे झाल्यावर हळुवार हाताने चोळून काढून घ्या. हे त्वचेच्या टॅनिग कमी करण्यात फायदेशीर आहे. 
 
* चेहऱ्यावर वारंवार घाम येण्याच्या त्रासाने त्रस्त आहात तर चंदनाचे फेसपॅक या पासून मुक्ती देईल. चंदन चेहऱ्याला थंडावा देतो. या साठी आपल्याला चंदन पावडर मध्ये गुलाबपाणी आणि कच्च दूध मिसळून आपल्या चेहऱ्यावर लावून घ्या. काही वेळा नंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या.