शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (09:00 IST)

फेशियल टिकवून ठेवताना...

फेशियलमुळे चेहरा खुलतो, ताजातवाना दिसू लागतो. ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन केलेलं महागडं फेशियल बराच काळपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी नंतरही विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा, चेहरा पुन्हा कोमेजू शकतो. एखाद्या खास कार्यक्रमासाठी फेशियल केलं असेल आणि ते दोन ते तीन दिवस टिकवून ठेवायचं असेल तर या टिप्स फॉलो करता येतील...
* भरपूर पाणी पिण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. त्यातही फेशियल केल्यानंतर किंवा स्कीन ट्रीटमेंट घेतल्यानंतर पाणी पिणं आवश्यक आहे. पाण्यामुळे त्वचेला आवश्यक तो ओलावा मिळतो आणि त्वचेतल्या पेशी अधिक चांगल्या पद्धतीने काम करू लागतात. पाण्यामुळे शरीरातले विषारी घटक बाहेर फेकले जातात. यामुळे शरीर अधिक चांगल्या प्रकारे पोषणमूल्यं शोषून घेतं. यामुळे चेहरा नितळ आणि मुलायम दिसू लागतो.
* फेशियल केल्यानंतर साधारण आठवड्याभराने एक्सफोलाईट म्हणजे स्क्रबिंग करा. यामुळे त्वचा अधिक मुलायम आणि नितळ दिसू लागते. स्क्रबिंगमुळे मृत पेशी निघून जातात आणि चेहरा छान टवटवीत दिसतो.
* फेशियलनंतर साधारण 24 तास साबण किंवाफेसवॉशचा वापर करू नये. त्यानंतर चेहरा धुवायला हरकत नाही. त्वचा संवेदनशील असेल तर कोमट पाण्याने तोंड धुवा. तसंच स्क्रबचा वापर करू नका. स्क्रबिंगमुळे त्वचेवर पुरळ येऊ शकतं. त्यामुळे अधिक काळजी घ्यायला हवी. फेशियलनंतर चेहर्यातला ‘क' जीवनसत्त्वयुक्त सीरम लावा. यामुळे चेहर्याळला वेगळीच चमक येईल. शिवाय सुरकुत्याही कमी होतील.
* फेशियलनंतर चेहर्यारला वारंवार हात लावू नका.
* फेशियल किंवा स्कीन ट्रीटमेंटनंतर चेहर्या ला मॉईश्चरायझर लावायला हरकत नाही.
 
आरती देशपांडे