शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

जनावर निवडा आणि जाणून घ्या आपला स्वभाव

आपण कोणता जनावर किंवा पक्षी निवडता किंवा आपल्याला कोणता जनावर आवडतो यावर आपला स्वभाव कळून येतो. येथे जनावरांचे नाव दिले आहे आणि आपण त्याबद्दल जाणून घेण्यापूर्वी जनावर निवडा आणि जाणून घ्या आपल्या स्वभावात काय कमी आहे ते:
 
गिधाड, काळी मांजर, कोळी, जग्वार, काळा कावळा, वटवाघूळ, लांडगा
 
 
गिधाड
अवसरवादी गिधाड हे मुर्दाखोर म्हणूनही ओळखले जातात. हे कमजोर किंवा मृत जनावर खातात. आपण गिधाड निवडले असल्यास आपण शांत स्वभावाचे आहे आणि रागीट मुळीच नाही परंतू तेवढेच धोकादायकदेखील कारण हल्ला करण्यासाठी आपण योग्य वेळेची वाट बघत असतात.
 
काळी मांजर
मांजर एकटे राहणे पसंत करते. काळी मांजर निवडणारे ऐकलकोंडे असतात. एकटे काम करणे पसंत करतात. आपल्या कार्ययोजनेवर योग्यरीत्या आणि मन लावून पुढे वाढतात.
 
कोळी
आपण खूपच हाताळू आहात. आपण धोक्याने लोकांना आपल्या सापळ्यात फासून घेता. आपण समोरच्याला यात अडकण्याची स्थिती निर्माण करतात. जाळीत अडकलेल्याचा खात्मा केल्याशिवाय आपल्याला बरं वाटतं नाही.
 
जग्वार
आपण रहस्यमय आहात यामुळे लोकं आपल्याकडे आकर्षित होतात. तसेच आपण ताकदवान असल्यामुळे लोकं आपल्याला भितात. आपण कोणाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत नसून एकटे काम करणे पसंत करतात.
 
काळा कावळा
आपण समजूतदार आणि सहज व्यक्ती आहात. आपण दुसर्‍याशी व्यवहार करताना खूप सावध असता. आपण खाजगी व्यक्ती आहात जी बाहेरच्या दुनियेपासून दूर असते.
 
वटवाघूळ
आपले वैक्तिमत्व अगदी वेगळे आहे. आपण आपले जीवन स्वत:च्या हिशोबाने जगणे पसंत करतात. याव्यतिरिक्त आपण खूपच विस्तृत व्यक्ती आहात जी दुनियेला वेगळ्याच दृष्टिकोनातून बघते. आपल्यालाही आपल्या वेगळ्या स्वभावाची जाणीव असते.
 
लांडगा
कोणाचा कशाप्रकारे आणि कधी शिकार करायचे हे आपल्याला चांगलेच माहीत असतं. आपण शक्तिशाली आणि ऐकलकोंडे आहात. आपल्याला आपल्या शक्तीची जाणीव असून त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे चांगलेच माहीत असतं.