शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

काळ्यामिर्‍याचे 5 दाणे पूर्ण करतील तुमचे सर्व काम

बरेच प्रयत्न केल्यानंतर देखील तुमचे काम पूर्ण होत नाही किंवा होता होता राहून जातात. जर तुमचे काम देखील असेच बिघडत असतील तर तुमच्या किचनमध्ये असणारी एक छोटीशी वस्तू तुमच्या सर्व अडचणींना दूर करण्यास मदत करेल. याने केलेले लहान लहान आणि सोपे उपाय तुमच्या समस्यांचे समाधान तर करतीलच तसेच तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांतीचे वातावरण निर्माण करेल.    
 
आम्ही तुम्हाला सांगत आहोत काळ्या मिरचीचे काही सोपे उपाय. 
 
जर तुमचे काम सारखे सारखे बिघडत असेल तर घरातून निघताना घराच्या प्रवेश दारावर थोडे काळे मिरे ठेवावे आणि त्यावर पाय ठेवून निघून जायला पाहिजे. असे केल्याने तुमच्या कामात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.  
 
थोडे काळे मिरे घेऊन एका दिव्यात ठेवून त्याचा जाळ करावा आणि त्याला घरातील एका कोपर्‍यात ठेवून द्यावे. असे केल्याने कोणाची वाईट नजर घरावर पडत नाही आणि नकारात्मकता देखील संपुष्टात येते.  
 
काळ्या मिर्‍याच्या साहाय्याने शनी दोष दूर होतो. एका काळ्या कपड्यात काळे मिरे आणि काही पैसे बांधून ही पोटली कोणाला दान करावी. याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला लगेचच बघायला मिळतील.  
 
अचानक धन प्राप्तीसाठी काळ्या मिर्‍याचे 5 दाणे घेऊन आपल्यावरून 7 वेळा फिरवावे. आता चौरस्त्यावर वर जाऊन याचे 4 दाणे चारी दिशेत आणि पाचवा दाणा आकाशात उडवावा. आता मागे वळून न बघता घरी परत यावे. यामुळे धनप्राप्ती होण्यास मदत मिळते.