रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By
Last Modified: सोमवार, 26 ऑगस्ट 2019 (14:41 IST)

आवडता जोडीदार किंवा आर्थिक प्रगती, अत्तराचे हे सोपे टोटके केल्याने प्रत्येक काम होतील सोपे

जास्त करून लोक आपल्या दिनचर्येत अत्तर किंवा परफ्यूम इत्यादीचा वापर करतात. या प्रकारचा सुवास, खास करून अत्तराचा वापर प्राचीनकाळापासून सुरू आहे. दिवसभर लोक सुगंधित राहण्यासाठी अत्तराचा प्रयोग करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की कपड्यांना सुवासित करणारा अत्तर तुमच्या जीवनाला देखील सुगंधित करू शकतो. अत्तराचे 1-2 थेंब तुमचे भाग्य बदलू शकतात. जीवनात आर्थिक स्थितीत सुधार आणायचा असेल किंवा मनाप्रमाणे प्रेम हवे असेल तर अत्तराच्या टोटक्यांचा वापर करून तुम्ही असे करू शकता.  
करायचे असेल लव्ह मॅरेज  
तुम्ही कोणाला पसंत करता आणि त्याच्यासोबत विवाह करण्याची इच्छा बाळगून असाल पण हे शक्य होणे इतके सोपे दिसत नसताना तुम्ही हा उपाय करू शकता. प्रेम विवाहात जर अडचणी येत असतील तर त्याला दूर करण्यासाठी पांढर्‍या रंगाचे वस्त्र धारण करावे आणि कुठल्याही देवस्थानात गुलाब किंवा चमेलीचे अत्तर अर्पित करावे. हा उपाय केल्याने तुमच्या प्रेम विवाहात येणार्‍या अडचणी नक्कीच दूर होतील.  
लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर हे करा 
जर तुमच्या पर्समध्ये पैसे टिकत नसतील तर हा उपाय तुम्हाला करायला पाहिजे. तुम्ही तपकिरी रंगाचा पर्स घ्या आणि त्यात चार नोटांवर चंदनाचा अत्तर लावून ठेवा. लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे या नोटांना तुम्ही खर्च करू नका. चंदनाच्या अत्तराच्या सुवासाने लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमची पर्स सदैव भरलेली राहील.  
ऑफिसमध्ये हवी आहे प्रगती 
जर तुम्हाला तुमच्या मेहनती प्रमाणे यश मिळत नसेल तर आणि तुम्हाला तुमची वेगळी प्रतिमा तयार करण्यात देखील यश मिळत नसेल तर हा उपाय नक्की करून बघा. जर तुम्हाला ऑफिसमध्ये खास जागा बनवायची असेल तर मोगरा, रातराणी आणि चंदनाच्या अत्तराचा वापर करावा. यामुळे कामाच्या क्षेत्रात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.  
हवा आहे देवाचा आशीर्वाद
देवाला प्रसन्न ठेवण्यासाठी आणि सदैव त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना चंदन, कापूर, चंपा, गुलाब, केवडा इत्यादी ने तयार अत्तर अर्पित करावे.