शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

गणेशोत्सवाच्या तोंडावर पेट्रोल, डिझेल भडकले!

दिल्ली: पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करत पेट्रोलियम कंपन्यांनी धक्का दिला. पेट्रोल दरात प्रतिलिटर 3.38 रुपये तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2.67 रुपये वाढ करण्यात आली आहे.
 
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यास पेट्रोल दरात कपात करण्याची तयारी तेल कंपन्यांनी दर्शवली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतील हे चढ-उतार कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून आहेत. तसेच सध्या दरांमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय सरकारने पेट्रोलियम कंपन्यांवर सोपविल्यामुळे दर 15 दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात किंवा वाढ केली जात आहे.
 
भविष्यात कच्च्या तेलाचे दर वाढल्यास पेट्रोल-डिझेलचे दर आणखी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. जुलै महिन्यापासून कपात होणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर आता वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आल्यानं सामान्यांच्या खिशाला मात्र चाट बसणार आहे.
पेट्रोलचे दर: मुंबई (दरवाढीनंतर)  68.40 रुपये