शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 1 ऑक्टोबर 2023 (12:58 IST)

1 October New Rules: टीसीएस, डीमॅट आणि जन्म प्रमाणपत्राशी संबंधित नियम आज पासून बदलले

money
1 October New Rules: ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीस, आम्ही नवीन तिमाहीत प्रवेश करत आहोत. 1 ऑक्टोबर 2023 पासून नवीन तिमाहीच्या सुरुवातीसह अनेक नवीन नियम बदलत आहेत. हे नियम आपल्या सर्वांवर परिणाम करणार आहेत.चला तर मग जाणून घेऊ या.
 
म्युच्युअल फंड नामांकन-
म्युच्युअल फंड खात्यांमध्ये नॉमिनी जोडण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 ही निश्चित करण्यात आली होती. अशा परिस्थितीत, ज्या खात्यांमध्ये नॉमिनी जोडले गेले नाहीत, त्यांचे डेबिट 1 ऑक्टोबरपासून गोठवले जाऊ शकते.
 
टीसीएसशी संबंधित नवीन नियम:-
1 ऑक्टोबरपासून क्रेडिट कार्डवरील 7 लाख रुपयांपेक्षा जास्त परदेशी खर्चावर 20 टक्के टीसीएस लागू केला जाईल. तथापि, जर असा खर्च वैद्यकीय किंवा शैक्षणिक कारणांसाठी केला जात असेल तर, टीसीएस फक्त पाच टक्के आकारला जाईल
परदेशात शिक्षणासाठी कर्ज घेणाऱ्यांना 7 लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा 0.5 टक्के दराने टीसीएस भरावा लागेल.
 
डीमॅट खात्यात नॉमिनेशन -
डीमॅट खात्यात नॉमिनेशन जोडण्याची अंतिम तारीख देखील 30 सप्टेंबर 2023 रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत, ज्यांनी अद्याप त्यांच्या डिमॅट खात्यांमध्ये नामनिर्देशित व्यक्तीचे नाव जोडलेले नाही त्यांना 1 ऑक्टोबरपासून अडचणी येऊ शकतात.
 
1 ऑक्टोबरपासून जन्म प्रमाणपत्र अनिवार्य -
अनेक गोष्टी सिद्ध करण्यासाठी जन्म प्रमाणपत्र एकच कागदपत्र असेल. नव्या नियमांनुसार जन्म-मृत्यूची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा, 2023 1 ऑक्टोबरपासून लागू होत आहे. या नियमानुसार जन्म-मृत्यूची नोंदणी करणे बंधनकारक होणार आहे. गृह मंत्रालयाने 13 सप्टेंबर रोजी याबाबत अधिसूचना जारी केली होती. शाळांमध्ये प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्स जारी करणे, मतदार यादी तयार करणे, विवाह नोंदणी, सरकारी नोकरी, सार्वजनिक उपक्रम, पासपोर्ट जारी करणे आणि आधार क्रमांक यासह विविध प्रक्रियेसाठी जन्म प्रमाणपत्र महत्त्वपूर्ण ठरेल.
 
₹ 2000 च्या नोटा 7 ऑक्टोबर नंतर बँकेच्या शाखांमध्ये बदलल्या जाणार नाहीत-.
₹ 2000 च्या नोटा फक्त 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत बदलल्या जाणार होत्या, त्यामुळे या नोटा बाळगणाऱ्यांना 1 ऑक्टोबरपासून समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मात्र, आता आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. 7 ऑक्टोबरनंतर, एखाद्याला रुपयाच्या नोटा बदलून घेण्यासाठी थेट आरबीआयशी संपर्क साधावा लागेल कारण स्थानिक बँकांमध्ये त्या बदलण्याची अंतिम मुदत संपणार आहे.
 





Edited by - Priya Dixit