मंगळवार, 16 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

200 रुपयांची नोट येणार, एटीएम मशिनमध्ये बदल नाही

200 rupees notes

200 रुपयांची नोट लवकरच चलनात येत आहे. विशेष म्हणजे म्हणजे 200 रुपयांच्या नोटांसाठी एटीएम मशिनमध्ये कोणतेही बदल करण्याची गरज भासणार नाही. आता  200 रुपयांच्या नोटांची छपाई मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आली आहे. ही नोट चलनात आणण्याची तारीखही ठरवण्यात आली आहे. चलनात आल्यानंतर 200 रुपयांच्या नोटांची कमी भासू नये, यादृष्टीने छपाईचे प्रयत्न सुरु आहेत.