मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (11:34 IST)

लवकरच 50 रुपयांच्या येणार नव्या नोटा!

50 rupee new note
नोटाबंदीनंतर पाचशे आणि दोन हजारांच्या नवीन नोटा आल्या तशाच प्रकारची ५० रुपयांची नवीन नोट चलनात येणार आहे. नवी नोट चलनात आल्यानंतरही जुनी ५० ची नोट चलनात कायम राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. हिरवट-निळ्या रंगाच्या या नव्या नोटेवर हम्पी येथील दगडी रथाची प्रतिकृती असेल.
 
दगडी रथाची प्रतिकृती 
या नोटेची प्रिंटिंग आणि डिझाइन 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांप्रमाणेच आहे. या नोटांच्या मागील बाजूस दक्षिणेकडील प्रसिद्ध हंपी दगडी रथाची प्रतिकृती आहे. या नोटेवर २०१६ हे छपाई वर्ष असेल. अशा नोटांच्या बंडलांचे फोटो सध्या व्हायरलही झाले असून, ते रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ‘नमुना’ नोटेसारखेच आहेत.