मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

अमेजनमध्ये 50 हजार पदांसाठी भरती

amazon vacancy
ऑनलाईन रिटेल कंपनी अमेजनमध्ये 50 हजार पदांसाठी भरती होणार आहेत. कंपनी 10 ते 15 ऑक्टोबर आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल इव्हेंटचा आयोजन करत आहे. कंपनीच्या व्हाइस प्रेसिडेंट (इंडिया कस्टमर फुलफिलमेंट) अखिल सक्सेना यांनी ही माहिती दिली आहे.
 
त्यांनी सांगितले की 'लोकांच्या खरेदी करण्याचा अनुभव चांगला करण्यासाठी आम्ही टीमचा विस्तार करत आहोत. कस्टमर सर्व्हिस सेंटरची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट केली गेली आहे. अस्थायी कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल इव्हेंटसाठी महत्त्वाची ठरेल.' 
 
सक्सेना यांनी सांगितले की 'अमेजन इंडियाचे देशभरात 50 हून अधिक फुलफिलमेंट सेंटर, अनेक सॉर्टिंग सेंटर आणि सुमारे 150 डिलिव्हरी सेंटर आहे.' त्यांनी सांगितले की कंपनीने मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, बेंगलुरू, अहमदाबाद, सह अनेक शहरांमध्ये आपले इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिलिव्हरी नेटवर्क मजबूत केले आहे. 
 
अमेजन इंडिया आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स कंपन्या दरवर्षी सण असले की सेल इव्हेंट आयोजित करतात. या दरम्यान मोठ्या प्रमाणात मिळणार्‍या ऑर्डरची डिलिव्हरीसाठी हजारो लोकं स्थायी रूपात काम करतात.