मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (16:19 IST)

सुमारे १० लाख नोंदणीधारक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत सहभागी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये नोव्हेंबर २०२० मध्ये सुमारे १० लाख नोंदणीधारक सहभागी झाल्याचे आढळून आले आहे. ईपीएफओचा अस्थायी वेतनपट आज प्रसिद्ध करण्यात आला, त्यात ही माहिती देण्यात आली.
 
कोविड-१९ महामारी असूनही, चालू आर्थिक वर्षात सुमारे ४५ लाख नवीन सदस्यांची भर पडली आहे.
 
प्रकाशित केलेल्या आकडेवारीत या महिन्यात सामील झालेल्या आणि ज्यांचे योगदान प्राप्त झाले आहे अशा सदस्यांचा समावेश आहे. बाहेर पडलेले सदस्य पुन्हा सामील होतात यातून हे देखील सूचित होते, की भारतात सक्रिय कोविड-१९ रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे कामगार पुन्हा आपल्या नोकरीकडे वळत आहेत.
 
राज्यांच्या वेतनपटाच्या आकडेवारीच्या तुलनेत महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांचा चालू आर्थिक वर्षात एकूण वेतनपट वाढीमध्ये ५३ टक्के इतका वाटा असून सर्व वयोगटात रोजगार सुधारण्याच्या बाबतीत आघाडीवर आहेत.