शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

Paytm Payments Bank द्वारे FD मध्ये गुंतवणूक करा, बँकांपेक्षा अधिक व्याज मिळवा

FD मध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी फायद्याची बातमी आहे. आपण Paytm Payments Bank द्वारे एफडी मध्ये गुंतवणूक केल्यास मोठं-मोठ्या बँकांपेक्षा अधिक व्याज मिळवू शकता. पेटीएम पेमेंट्स बँकेने आपल्या ग्राहकांसाठी फिक्स्ड डिपॉझिट सर्व्हिस देण्यासाठी सूर्योदय स्मॉल फाइनेंस बँक सोबत भागीदारी केली आहे. या अंतर्गत पेटीएम पेमेंट्स बँकेचे ग्राहक सूर्योदय स्मॉल फाइनेंस बँकच्या एफडीमध्ये गुंतवणूक करू शकतात.
 
तसेच पेटीएम पेमेंट्स बँक आधीपासून इंडसइंड बँकेसोबत एफडी सर्व्हिस ऑफर देत आहे. ज्यात आपण 100 रु च्या किमान गुंतवणुकीने सुरुवात करू शकतात. या नवीन भागीदारीसह पेटीएम पेमेंट्स बँक मल्टी-पार्टनर एफडी सेवा सुरू करणारा देशातील पहिली पेमेंट बँक आहे, जेथे ग्राहक आपल्या आवडीनुसार पार्टनर बँकेची निवड करू शकेल.
 
ग्राहकांना फायदा
आता पेटीएम पेमेंट्स बँकेद्वारे एफडीमध्ये गुंतवणूक करणार्‍या ग्राहकांना 2 बँकेचे पर्याय आहे. याबद्दल निर्णय घेण्यापूर्वी इतर गोष्टींव्यतिरिक्त किमान गुंतवणूक, व्याज दर आणि अवधी सारख्‍या गोष्टींची तुलना करता येऊ शकते आणि आपण त्या हिशोबाने आपल्या बँकेची निवड करू शकता. उल्लेखनीय आहे की पेटीएम पेमेंट्स बँक पार्टनर बँकांपैकी कोणाकडूनही एफडीच्या लिक्विडेशनवर कोणतेही शुल्क आकारत नाही. अनेक ग्राहक 'ऑटो-क्रेडिट फिक्स्ड डिपॉझिट' सुविधा पसंत करतात ज्यात त्यांना आपल्या सेव्हिंग खात्यावर एफडी लिमिट सेट करण्याची सुविधा मिळते.
 
सूर्योदय स्मॉल फाइनेंस बँकेची एफडी दर
सामान्य नागरिकांना या बँकेत 2 कोटी रु हून कमीच्या एफडीवर 7 ते 14 दिवसांच्या कालावधीत 4 टक्के व्याज मिळेल. 
15 ते 45 दिवसांच्या एफडीवर देखील 4 टक्के व्याज मिळेल. 
याच प्रकारे 46 ते 90 दिवसांवर 5 टक्के, 
91 दिवस ते 6 महिन्यावर 5.50 टक्के, 
6 महिने ते 9 महिन्यापर्यंत 6.25 टक्के,
9 महिने ते एक वर्षापर्यंत 6.50 टक्के, 
1 ते 2 वर्षापर्यंत 6.75 टक्के, 
2 ते 3 वर्षापर्यंत 7.15 टक्के, 
3 ते 5 वर्षापर्यंत 7.25 टक्के, 
5 वर्षाच्या एफडीवर 7.50 टक्के 
आणि 5 ते 10 वर्षापर्यंत 7 टक्के व्याज मिळेल.