शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

अझीम प्रेमजी: ऑयल कंपनी ते ग्लोबल आयटी कंपनीचा प्रवास करणारे दानवीर व्यक्तिमत्त्व

विप्रो चेयरपर्सन अझीम प्रेमजी आज कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहे. गेल्या 53 वर्ष कंपनीच्या प्रमुखाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.  या पदावर त्यांचे पुत्र रिषद प्रेमजी यांची नियुक्ती झाली आहे.
 
देशातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती
वयाच्या 21 व्या वर्षी वडील मोहम्‍मद हाशिम प्रेमजी यांची कुकिंग ऑयल कंपनी वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स लिमिटेड (WIPRO) चा कारभार सांभाळणारे प्रेमजी आज देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या क्रमांवर आहे आणि Wipro या देशाची सर्वात चार मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे.
 
बर्माच्या राईस किंग होते वडील
प्रेमजी यांचं कुटुंब मूळ रुपाने बर्मा (म्यांमार) येथील असून त्यांचे वडील मोहम्‍मद हाशिम बर्माचे राईस किंग म्हणून ओळखले जात होते. काही अज्ञात कारणांमुळे त्याचं कुटुंब 1930-40 च्या दशकात भारताच्या गुजरातच्या कच्छ येथे आले असून तेथे देखील त्यांनी तांदळाचा व्यवसाय सुरू केला. त्यात यश मिळालं आणि कालांतराने हाशिम यांनी आपला व्यवसाय तांदूळ ते वनस्पती तुपाकडे वळवले आणि 1945 मध्ये त्यांनी वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स लिमिटेडचे गठन केले.
 
21 व्या वर्षी सांभाळली वडिलांची जबाबदारी
वडील मोहम्मद हाशिम यांच्या मृत्यूनंतर वयाच्या 21 व्या वर्षात अझीम प्रेमजी यांना अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील अभ्यास सोडून भारतात यावे लागले आणि वडिलांच्या कंपनीची धुरा सांभाळावी लागली. तेव्हा पर्यंत तरुण अझीम यांना व्यवसायाचा काही अनुभव नव्हता. वेळेसोबत त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आणि विप्रोला एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये परिवर्तित केलं.
 
कंपनीने घेतला वेग
अझीम प्रेमजी यांनी व्यवसाय सांभाळला त्याच्या वर्षभरापूर्वी कंपनीचं बाजार मूल्य सुमारे 7 कोटी रुपये होतं. त्या काळाच्या हिशोबाने कंपनी मोठीच होती. प्रेमजी यांनी कंपनीची पॉलिसी, तांत्रिक आणि प्रॉडक्ट्सवर फोकस करून वेग घेतला. अझीम यांनी 1980 मध्ये आयटी बिझनेसमध्ये पाऊल टाकले आणि कंपनी पर्सनल काम्प्यूटर तयार करू लागली आणि सॉफ्टवेअर सर्व्हिसेजची देखील सुरुवात झाली. यासोबतच कंपनीचं नाव परिवर्तित करून विप्रो (WIPRO) ठेवलं गेलं.
 
व्हेजिटेबल ऑयल कंपनी ते ग्लोबल आयटी कंपनी
1989 मध्ये प्रेमजी यांनी अमेरिकी कंपनी जनरल इलेक्ट्रिकल्स (GE) सोबत मिळून मेडिकल उपकरणे तयार करण्यासाठी ज्वाइंट वेंचर बनवले आणि नंतर या प्रकारेच व्हेजिटेबल ऍड रिफाइंड ऑयल, बेकरी, टॉयलेटरी आणि  लाइटिंग इतर प्रॉडक्ट तयार करणार्‍या कंपनीला प्रेमजी यांनी आजच्या परिपेक्ष्यात 1.8 लाख कोटी रुपयांची जागतिक पातळीची आयटी कंपनीत परिवर्तित केले. टाइम मॅगजीनकडून वर्ष 2004 आणि 2011 मध्ये सर्वात प्रभावी लोकांच्या यादीत सामील होऊन चुकलेले अझीम प्रेमजी भारतीय आयटी इंडस्ट्रीचे दिग्गज म्हणून ओळखले जाता.
 
52750 कोटी रुपयांचे शेअर दान केले
फोर्ब्सच्या यादीत प्रेमजी जगात 38 व्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण नेटवर्थ 510 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2018 मध्ये ते रिलायंस इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या नंतर भारताचे दुसरे श्रीमंत व्यक्ती होते. मागील मार्च महिन्यात त्यांनी विप्रोचे 34 टक्के शेअर, ज्यांची मार्केट वेल्यू 52750 कोटी रुपये आहे, चॅरिटीसाठी दान केले. अझीम प्रेमजी फाउंडेशनने तेव्हा आपल्या वक्तव्यात म्हटले होते की प्रेमजी यांनी आपल्या खाजगी संपत्तीचा त्याग करून त्याला धर्मार्थ कार्यांसाठी दान करून परोपकारासाठी आपली प्रतिबद्धता दर्शवली आहे.