बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

SBI ग्राहक सजग व्हा! हा मेसेज आल्यावर अशी चूक मुळीच करू नका

एसबीआय (स्टेट बँक ऑफ इंडिया) आपल्या ग्राहकांना उत्तम सुविधा आणि त्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्न करत आहे. बँक सतत आपल्या ग्राहकांना एसएमएस पाठवत आहे. ज्यात सांगण्यात येतंय की रिवॉर्ड पॉइंट च्या नावावर कशा प्रकारे फसवणूक केली जात आहे. असे लबाड लोकांचे क्रेडिट कार्ड डिटेल्स काढून त्यांची लाखो रुपायांची फसवणूक करत आहे... जाणून घ्या काय आहे प्रकरण....
 
ग्राहकांना पाठवले हे SMS- बँकने पाठवलेल्या एसएमएस मध्ये सांगण्यात आले आहे की ग्राहकांना रिवॉर्ड पाइंटच्या नावाखाली गिफ्ट वाउचर देण्याचा वादा करणार्‍या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. सोबतच ओटीपी (वन टाइम पासवर्ड) शेअर करू नये. बँकेने या मेसेजमध्ये एक व्हिडिओ लिंक देखील शेअर केली आहे. लोकांची कशा प्रकारे फसवणूक केली जात आहे या व्हिडिओ दर्शवले गेले आहे.
 
या प्रकारे करतात फसवणूक- या जाळ्यात अडकलेल्या एका व्यक्तीने सांगितले की एके दिवशी त्यांच्याकडे रिवार्ड पॉइंट्स रीडिम करण्याचा SMS आला. या रिवॉर्ड पॉइंट SMS द्वारे फॉर्मवर त्यांच्याकडून खाजगी माहिती भरवण्यात आली ज्यात ईमेल, डेबिट कार्ड नंबर व इतर माहिती सामील होती. पूर्ण फार्म भरल्यानंतर काही क्षणातच त्यांच्या कार्डने ट्रांझेक्शन झाल्याचा मेसेज त्यांना मिळाला. नंतर त्यांनी याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली. एक्सपर्ट्सप्रमाणे हे लोकं ओटीपी ईमेल हॅक करून घेतात.
 
या प्रकारे वाचू शकता- बँकेप्रमाणे बँक अधिकारी कधीही एसएमएस आणि ई-मेल द्वारे आपल्या बँक खात्याची माहिती मागत नसतात. म्हणून अशा प्रकाराच्या एसएमएसपासून सावध राहावे. तरी आपल्यासोबत कोणत्याही प्रकाराचा फ्रॉड झाल्यास लगेच पोलिसांकडे तक्रार दाखल करावी. सोबतच बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध नंबरद्वारे बँकेला याबाबद माहिती द्यावी.