१० जानेवारीपासून चेन्नई - शिर्डी विमानसेवा
साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रविवारी जयपूर, बंगळूरू, भोपाळ व अहमदाबाद या चार नवीन शहरांना विमान सेवा सुरू झाली १० जानेवारीपासून चेन्नईसुद्धा विमानसेवेने जोडले जाणार आहे. सव्वा वर्षापूर्वी शिर्डी विमानतळ वाहतुकीसाठी खुले झाल्यानंतर सुरूवातीला एअर इंडियाने मुंबई व हैदराबादसाठी विमान सेवा सुरू केली होती.
महिनाभरापूर्वी दिल्लीसाठी सेवा सुरू झाली. रविवारी आणखी चार अशी आतापर्यंत आठ शहरे शिर्डीशी जोडली गेली आहेत. सध्या शिर्डीला रोज २० विमाने येत-जात आहेत़ पंधरवाड्यात यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.