सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 नोव्हेंबर 2018 (09:05 IST)

बाप्परे, पोटातून काढले खिळे, नट-बोल्ट, पिना आणि बांगड्या

शिर्डी येथील संगीता नावाच्या मध्यमवयीन महिलेच्या पोटावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून खिळे, नट-बोल्ट, पिना आणि बांगड्या यासह एकूण दीड किलो वजनाच्या वस्तू बाहेर काढण्यात आल्या. मानसिक आजार असलेली ही महिला शहराच्या शहर कोठडा भागात भ्रमिष्ट अवस्थेत फिरताना आढळल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तिला सरकारी मनोरुग्णालयात ठेवले होते. पोटात असह्य वेदना होत असल्याची तक्रार केल्याने तिला सिव्हिल इस्पितळात दाखल केले.
 
इस्पितळात एक्स-रे काढला असता तिच्या पोटात अनेक अखाद्य वस्तूंचा मोठा संचय झाल्याचे आणि काही सेफ्टी पिना तिच्या डाव्या फुफ्फुसातून बाहेर लोंबकळत असल्याचे दिसले. डॉ. नितीन परमार यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या चमूने संगीतावर शस्त्रक्रिया केली. अडीच तास चाललेल्या शस्त्रक्रियेत तिच्या पोटातून एक इंच लांबीचे लोखंडी खिळे, नट-बोल्ट, तांब्याची वळी, बांगड्यांचे तुकडे, सेफ्टी पिना, केसाच्या पिना, मंगळसूत्र आदी गोष्टी काढल्या.