1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (08:52 IST)

पुन्हा Amazon, Flipkart ची सेवा सुरू होणार

Amazon
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. त्यानंतर Amazon, Flipkart सारख्या कंपन्यांनीही आपली सेवा काही काळासाठी बंद केली होती. त्यानंतर आता पुन्हा Amazon, Flipkart ची सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर ग्राहकांना मोबाईल फोन, टिव्ही, फ्रिज यांसारख्या ईलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करता येणार आहेत. २० एप्रिल पासून या ई कॉमर्स कंपन्यांना सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून याबाबत माहिती देण्यात आली.
 
मोबाईल फोन, टिव्ही, लॅपटॉप आणि अन्य वस्तू २० एप्रिलपासून ई कॉमर्स कंपन्यांच्या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. परंतु या कंपन्यांच्या सामानांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना संबंधित प्राधिकरणाची मंजुरी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहं. बुधवारी जारी करण्यात आलेल्या नव्या सुचनेनुसार ठराविक कमर्शिअल आणि खासगी सेवांना लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात सुट देण्यात आली आहे. यापूर्वी ई कॉमर्स कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची परवानगी देण्यात आली होती.