सोमवार, 12 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 31 डिसेंबर 2016 (15:45 IST)

खुशखबर : एटीएममधून 4500 रुपये प्रत्येक दिवसाला काढता येणार

ATM Machine money
नविन वर्षात अर्थात 1 जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढविण्यात येणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जानेवारी 2017 पासून एटीएममधून 4500 रुपये प्रत्येक दिवसाला काढता येणार आहेत. 8 नोव्हेंबरला मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. एटीएममधून केवळ सुरुवातीला फक्त 2500 रुपये काढता येत होते. मात्र, आता ही मर्यादा वाढविण्यात आली असून आता एकावेळी 4500 रुपये काढता येणार आहेत.