सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 17 एप्रिल 2018 (09:40 IST)

या राज्यांमध्ये रोख रकमेचा तुटवडा

देशातील चार राज्यांमध्ये अचानक रोख रकमेचा तुटवडा पडला आहे. बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या अनेक शहरांतल्या एटीएममध्ये पैसेच नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा नोटाबंदीच्या काळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं स्थिती आहे. सणासुदीच्या काळात कॅशला आलेल्या मागणीमुळे आता नोटांचा तुटवडा असल्याचं सांगितलं जात आहे. जितक्या नोट पुरवणं आवश्यक होतं, तितक्या नोटांचा पुरवठा झाला नाही असं रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांनी सांगितलंय. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. एक-दोन दिवसात परिस्थिती सामान्य होईल, असं आरबीआयने म्हटलं आहे.