1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2024 (16:14 IST)

Bank Holidays : जून महिन्यात 10 दिवस बँका बंद राहणार, यादी पहा

Bank Holidays
Bank Holidays in June 2024 :आजच्या काळात बँकांशी संबंधित अनेक कामे ऑनलाईन केली जातात. तरीही बँकेची अशी कामे असतात जी बँकेत जाऊनच पूर्ण केली जातात. या साठी  बँकेच्या शाखेत जावे लागते.जून महिन्यात 10 दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे सुट्टी कधी आहे ते तपासून घ्यावे. बँकेला सुट्ट्या कधी आहेत हे आधीच जाणून घ्या. दर आठवड्याच्या रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असते.
 
पुढील महिन्यात म्हणजे जून 2024 मध्ये एकूण 10 दिवस बँका बंद राहणार आहेत. यापैकी 7 सुट्ट्या शनिवार आणि रविवारी आहेत. याशिवाय इतर 3 सुट्ट्या आहेत. जूनमध्ये 2रा, 9वा, 16वा, 23वा आणि 30वा रविवार आहे. त्यामुळे या तारखांना बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. 8 जून हा दुसरा शनिवार आणि 22 जून हा चौथा शनिवार आहे. या तारखांनाही देशभरातील बँका बंद राहतील. याशिवाय 15 जूनला राजा संक्रांती असल्याने काही झोनमध्ये बँका बंद राहतील. 17 जून रोजी बकरी ईद आहे. या दिवशी संपूर्ण देशात बँका बंद राहतील. काही ठिकाणी 18 जूनला बकरी ईदही साजरी केली जाणार आहे. या तारखेलाही काही शहरांमध्ये बँका बंद राहतील.
 
जूनमध्ये या तारखांना बँका बंद राहतील
2 जून 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
8 जून 2024: दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
9 जून 2024: रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
15 जून 2024: भुवनेश्वर आणि आयझॉल झोनमध्ये YMA दिवस किंवा राजा संक्रांतीमुळे बँका बंद राहतील. 
16 जून 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
17 जून 2024: बकरी ईदमुळे देशभरातील बँका जवळपास बंद राहतील.
18 जून 2024: बकरी ईदमुळे जम्मू आणि श्रीनगर झोनमध्ये बँका बंद राहतील.
22 जून 2024: चौथ्या शनिवारमुळे बँकेला सुट्टी असेल.
23 जून 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
30 जून 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
 
Edited by - Priya Dixit