बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 25 फेब्रुवारी 2024 (15:07 IST)

Bank Holidays : मार्चमध्ये बँका 14 दिवस बंद राहतील, पहा संपूर्ण यादी

Bank Holidays
मार्च महिना सुरु होण्यासाठी फक्त काहीच दिवस उरले आहे. मार्च मध्ये 14 दिवस बँक बंद असणार या सुट्ट्यांमध्ये सर्व रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार समाविष्ट आहे. साप्ताहिक सुट्ट्या व्यतिरिक्त बँकांच्या सुट्ट्या सणासुदी मुळे बंद असणार. या सुट्ट्या प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या असतील. मार्च महिन्या मध्ये शिवरात्री, होळी आणि गुड फ्रायडे अशी सुट्टी आहे.सुट्ट्यांची यादी पाहून घ्या.
 
 1 मार्च रोजी मिझोराममध्ये चापचूर कुट, 
3 मार्च रोजी रविवार साप्ताहिक सुट्टीमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
8 मार्चला महाशिवरात्रीच्या/शिवरात्रीच्या सुट्टीमुळे आणि 
9 मार्चला दुसऱ्या शनिवारमुळे सर्व बँकांना सुट्टी असेल.
12 मार्च रोजी रमजान सुरू झाल्यामुळे रविवार, प्रतिबंधित सुट्ट्यांमुळे देशभरातील बँका 10 मार्च रोजी बंद राहतील.
17 मार्च रोजी रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
22 मार्चला पाटणामध्ये बिहार दिनानिमित्त बँका बंद राहतील, 23 ​​मार्चला भगतसिंग यांच्या हुतात्मा दिनानिमित्त अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल.
24 मार्च रोजी देशभरातील बँकांना रविवार असल्याने सुट्टी असेल, या दिवशी होलिका दहनही आहे 25 मार्च रोजी  होळी/दोला यात्रेमुळे  देशभरातील बँका बंद राहतील.
29 मार्च रोजी गुड फ्रायडेमुळे बँका बंद राहतील 
30 मार्च महिन्याचा चौथा म्हणजेच शेवटचा शनिवार असल्याने देशभरातील बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही.
31 मार्चला रविवार असल्याने बँकेला सुट्टी असेल.
 
 Edited By- Priya Dixit