गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 (12:39 IST)

EPFO Interest Rate : 6 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, व्याजदरात वाढ

EPFO
EPFO Interest Rate Latest Update: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. EPFO च्या सुमारे 6 कोटी कर्मचाऱ्यांना व्याजदराची भेट मिळाली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2023-24 या वर्षासाठी व्याजदर 8.25 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना गतवर्षीच्या तुलनेत अधिक व्याज मिळणार आहे.
 
हा 3 वर्षातील सर्वोच्च व्याजदर आहे. 2022-23 साठी व्याजदर 8.15 टक्के होता. 2021-22 साठी व्याजदर 8.10 टक्के होता. 2020-21 साठी व्याजदर 8.5 टक्के होता, परंतु आता 2023-24 मध्ये व्याजदर 8.25 टक्के असेल. EPFO ची निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) ने शनिवारी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळताच हा नियम लागू होईल.