शुक्रवार, 2 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2017 (10:44 IST)

एसबीआय, आयडीबीआय, युनियन बँकेकडून कर्जाच्या व्याजदरात कपात

bank interest rate
देशातल्या एसबीआय, आयडीबीआय, युनियन बँके या मुख्य बँकांनी कर्जाच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. २००८ नंतरच्या जागतिक मंदीनंतरची ही सर्वांत मोठी व्याज दरकपात समजली जात आहे. दरात ०.९ टक्के कपात केल्याने एसबीआयच्या कर्जाचे आधारभूत दर आता ८.६५ टक्क्यांवरून ७.७५ टक्के झाले आहेत. बँकेचे एक वर्ष मुदतीचे कर्ज ८ टक्क्यांनी मिळेल तर दोन वर्षांच्या कर्जाला ८.१० टक्के तर तीन वर्षांसाठी ८.१५ टक्के व्याजदर असतील. एसबीआयचे नवे दर १ जानेवारीपासून लागू असतील. एसबीआयकडून महिलांच्या नावे देण्यात येणारे गृहकर्ज ८.२० टक्के दराने तर इतरांसाठी ८.२५ टक्के दराने गृहकर्ज मिळेल. या दरकपातीचे अनुकरण अन्य बँकांकडूनही होण्याची शक्यता आहे.